मोदी सरकार लोकशाहीची हत्या करून हुकुमशाही गाजवत आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संतोषसिंह रावत यांचा आरोप.

83

मूल : मोदी सरकारच्या भ्रष्ट व हुकूमशाही धोरणा विरोधात संसद व जनमानसात लढा देऊन सत्य समोर आणणाऱ्या राहुल गांधीची खासदारकी रद्द करून मोदी सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकार व भाजपची ही कृती लोकशाही विरोधी हुकुमशाहीचे द्योतक असल्याचा आरोप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केला.

स्थानिक पञकार भवनात आयोजित पञकार परीषदेत बोलताना संतोषसिंह रावत यांनी हुकुमशहा बनलेले केंद्रातील मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करुन सर्व सामान्य जनतेचा कष्टाचा पैसा आणि राष्ट्राच्या संपत्तीची उघडपणे लुट करत असुन अदानी सारख्या कर्ज बुडव्यांना संरक्षण देत असल्याचाही आरोप केला. केंद्र शासनाची ही कृती देशाला विघातककडे नेणारी असुन जनतेच्या विश्वासाला तडा पोहोचवणारी असल्याने भविष्यात जनता मोदी सरकारला माफ करणार नाही. असा विश्वासही रावत यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्या या कृतीचा जनतेला भविष्यात धोका होवु नये म्हणुन जनतेनी वेळीच सावध व्हावे. हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर केंद्र शासना विरूध्द जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी व लोकशाहीचे रक्षण करण्याकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशातल्या कानाकोप-यात जय भारत सत्याग्रह करण्यात येत असून तालुक्यातही करण्यात येत असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले यांनी सांगीतले.
लोकशाहीची हत्या करीत असलेल्या सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत असताना काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शासन यंञणेचा दुरूपयोगा करून कुंभाड रचत आहे. ही बाब निषेधार्ह असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती तथा न.प.चे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी व्यक्त केले. हुकुमशाही करणाऱ्या केंद्र सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणत असतांना राहुलजी गांधी यांनी स्विकारलेला आक्रमकपणा मूळे भविष्यात भाजपाला धोका होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेवुन राहुल गांधी यांचे विरोधात अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करण्याचे कारस्थान मोदी सरकारने चालविले आहे. अशाच एका जुन्या प्रकरणात राहुलजी गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावतांना न्यायालयाने त्यांना एका महिन्यात अपील करण्याची संधी दिली आहे. असे असताना वरीष्ठ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता दबावतंञाचा वापर करून दुसऱ्याच दिवशी राहुलजी गांधी यांचे लोकसभा सदस्य पदावरून निष्कासन केले. नव्हे तर त्यांना शासकीय बंगला खाली करण्याची सुचना सुद्धा दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या महीण्याभराची प्रतिक्षा न करता भाजपच्या मोदी सरकारला काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांचे विरूध्द कारवाई करण्यासाठी एवढी घाई कां सुटली ? हे न उलगडणारे कोडे आहे. असे सांगतांना शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी अलीकडे मोदी सरकार अधिकारात असलेल्या विविध यंञणेचा वापर करून विरोधकांवर सुड उगवुन लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारच्या सुडभावनेतुन होत असलेल्या कारवाईला काँग्रेस नेते राहुलजी गांधी कदापी घाबरणार नसुन वरीष्ठ न्यायालायाप्रती असलेला विश्वास आणि भारतीय जनतेच्या पाठिंब्यामुळे राहुल गांधी अधीक भक्कमपणे उभे राहुन मोदी शहाच्या हुकुमशाही प्रवृत्ती सोबतचं वाढती महागाई, निर्माण झालेली बेरोजगारी, अदानी सारख्या उद्योजकांना दिल्या जात असलेले संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि खाजगीकरणामूळे ञस्त झालेल्या जनतेच्या हक्कासाठी याहुन अधिक तिव्र लढा देतील. असा आम्हाला विश्वास असुन या लढ्यात देशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व आघाड्यांचा राहुलजी गांधी यांना पुर्णपणे पाठींबा आणि समर्थन आहे. राहुलजी गांधी यांचे विरूध्द षडयंञ रचणा-या हुकुमशाही केंद्र सरकारचा मूल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करीत असुन भविष्यात ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात आंदोलन करून राहुलजी गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहु. असा विश्वास तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरू गुरनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, माजी संचालक किशोर घडसे, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा रूपाली संतोषवार युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, प्रशांत उराडे, शामला बेलसरे, वैशाली काळे आदींनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here