मूल : सुशिक्षीत बेरोजगारांना स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्यात विविध पदाचे पंचाहत्तर हजार पद भरण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंञ्यांनी राजकिय दबावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीला स्थगिती दयावी, ही बाब आश्चर्यकारण असून लोकशाही प्रधान देशात राज्यातील सुशिक्षीत बेरोजगारांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप संजय ठाकुर यांनी केला आहे.
चंद्रपूर येथील श्रमीक पत्रकार भवनात आयोजीत करण्यांत आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना संजय ठाकुर यांनी मागील काही महिण्यांपासून जिल्हयातील काही राजकिय नेत्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकरी भरतीमध्यें राजकारण करण्याचा सपाटा चालविला असल्याचे सांगतांना संजय ठाकुर यांनी मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत विविध श्रेणीचे ८८५ पद मंजुर असून सध्यास्थितीत ५०१ कर्मचारी विविध पदावर कार्यरत आहेत. त्यामूळे सध्यास्थितीत ३६४ पद रिक्त असल्याचे सांगीतले. बॅंकेच्या विविध शाखेत आवश्यकतेप्रमाणे कर्मचारी कार्यरत नसल्याने कार्यरत कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढत असून त्यांना वारंवार आरोग्याचा त्रास जाणवत आहे. सांपत्तीक स्थितीत मजबुत असलेली जिल्हा मध्यवर्ती बॅंक शेतक-यांसोबतचं शासकिय व निमशासकिय कर्मचारी आणि कष्टकरी वर्गाशी जुळली असल्याने कामाचा व्याप लक्षात घेवून रिक्त असलेले पद भरण्यासाठी शासनाकडे परवानगी मागीतली. बॅंकेची वास्तविकता लक्षात घेवून शासनाच्या सहकार आयुक्ताने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी बॅंकेला ३६० पद सरळसेवेने भरण्याची मंजुरी दिली. त्यामूळे आम्हा बेरोजगारांना रोजगार मिळेल, अशी आशा वाटु लागली. परंतू जिल्हयातील काही लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्याने शासनाने १२ मे २०२२ रोजी नोकर भरतीला स्थगिती दिली. जिल्हयातील काही राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून शासनाने पद भरतीला स्थगिती दिल्यानंतर बॅंक प्रशासनाने वास्तविक परिस्थिती लक्षात आणुन देत पुन्हा पाठपुरावा केला तेव्हा शासनाच्या सहकार विभागाने २३ नोव्हेंबर २०२२ रोजी नोकर भरतीवरील स्थगिती उठवली, त्यामूळे नोकरीच्या आशेने पुन्हा बेरोजगार सुखावला असतांनाच २९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सहकार विभागाने पद भरतीला दिलेल्या परवानगीने पुन्हा स्थगिती दिली. हा सर्व प्रकार संशयास्पद असून जिल्हयातील काही राजकिय नेते बॅंकेच्या पद भरतीमध्ये राजकारण करून आम्हा बेरोजगारांच्या भावनांशी खेळत आहेत. असा आरोप संजय ठाकुर यांनी केला असून बेरोजगारांच्या भावनांशी खेळणा-या त्या राजकारण्यांना येत्या काळात बेरोजगार युवक युवती धडा शिकवतील. असा इशारा दिला आहे. यावेळी कुणाल ठेंगडे, किसान अरदळे, निखील दुर्योधन, दिपक मडावी, शुभम ठाकुर आणि चिराग ठेंगरे उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे जाहीर करणा-या मुख्यमंञ्यानी राजकिय दबावाला बळी पडून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पद भरतीला स्थगिती दयावी. ही कृती बेरोजगारांवर अन्याय करणारी असून येत्या काळात याविरूध्द बेरोजगार पेटुन उठल्या शिवाय राहणार नाही. असा विश्वास मूल तालुक्यातील शेकडो युवकांनी व्यक्त केला असून यासाठी लवकरच आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. असे मत व्यक्त केले आहे