शिव शाहू फुले आंबेडकर कर्मवीर विचारमंच मूलच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध

86

मूल : पिंपरी चिंचवड येथील आयोजित सभेत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केले, त्या व्यक्ताव्याच्या विरोधात मुल तालुका शिव शाहू फले आंबेडकर कर्मवीर विचार मंच मूल च्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला. पाटील हे पैठण येथील सभेत महाराष्ट्राचे दैवत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी त्या काळामध्ये लोकांना भीक मागून शाळा चालवीत होते असे अपमानास्पद व्यक्तव करुन या महापुरुषांचा अपमान केलेला आहे. त्या विरोधात मुल तालुक्यातील शीव फुले, शाहू, आंबेडकर कर्मवीर विचारमंच व समाजातर्फे आज मुल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली, सदर रॅली गांधी चौक येथे येवून मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार मुल यांचे मार्फतीने राष्ट्रपती तथा राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपदावरुन पाय उतार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी काण्यात आली आहे.

याप्रसंगी डॉ समीर कदम, गजानन चौधरी , प्रा.विजय लोणबले, डेव्हीड खोब्रागडे, ललिता फुलझले, राकेश रत्नावार,  भास्कर खोब्रागडे, गुरु चौधरी, रुपेश निमसरकार, विजया रामटेके आदी मान्यवरांनी मोर्चास मार्गदर्शन केले. सदर मोर्चा यशस्वी करण्यास नंदू बारस्कर, प्रशांत गट्टूवार, राकेश मोहुर्ले, ईश्वर लोणबले, सुरेश फुलझले, सुजित खोब्रागडे, पुरुषोत्तम साखरे  मनोज मोहर्ले, गुरू गुरनुले, किसन वासाडे, कृष्णा गोवर्धन, अनिल सोनुले,  दुशांत महाडोळे, कुमार दुधे, शाम उराडे, शैलेश वनकर, बबीता भडके, उषा दुर्गे, दत्तू मेश्राम, किसन गुरूनुले, अनुप आदे, ज्ञानेश्वर वाघमारे , राजेंद्र वाढई, यांनी अथक प्रयत्न केले. सदर रॅलीला शेकडोच्या संख्येने बहुजन समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुरेश फूलझेले व ओमदेव मोहूर्ले व आभार प्रदर्शन नंदू भाऊ बारस्कर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here