माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी घेतली वन विभागाचे मुख्य सचिव यांची शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक

132

मूल – राज्यातील ताडोबा बफर झोन चंद्रपूर येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे वनविभागाचे मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी व माजी मंञी शोभाताई फडणवीस यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये शोभाताई फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या, आणि त्यांना येणाऱ्या नेहमीच्या अडचणीला वाचा फोडून शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्या वन्यप्राणी वाघ व मनुष्य संघर्ष यामध्ये शेतकरी वाघाच्या दहशतीमुळे आपली शेती करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदार निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी आपले जीवन जगायचे कसे ? दुसरे रानडुकरांची संख्या, शेतीचे होणारे नुकसान. उभ्या पिकाची नासाडी करून रानडुक्कर शेतात येतात व पिकांची नुकसान करतात सध्या स्थितीत तुरीचे पीक पुलावर असून शेतात रानटी डूकराचा. कलपच शेतात घुसून तुरीच्या व भाजीपाला पिकाची नासाडी करीत आहेत .अशा वेळेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित सर्वेक्षण करून घेण्याचे आदेश त्या त्या तालुक्यातील वन परिक्षेत्र अधिकारी यांना द्यायला पाहिजे आणि तसा अहवाल त्वरित शासनाकडे पाठऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत द्यायला पाहिजे तरच शेतकरी जगू शकेल. कारण यापूर्वी मागील दोन वर्षात झालेल्या नुकसान भरपाईची मदत पुढील दोन वर्षात मिळत असते. तेव्हा शेतकरी बांधव खचून जाते. आणि वन विभागाकडून थातूरमातूर नुकसान भरपाई देण्यात येते .ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांची थट्टा करणारी असून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई देण्यात यावी व वनविभागाच्या नुकसान भरपाई चे निकष बदलून शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्यानुसार वनविभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शोभाताई फडणवीस यांनी मुख्य सचिव व पीसीसीएफ नागपूर यांचे कडे करून शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित निकाली काढावे .अशा मागणीचे निवेदन सादर करीत लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावे अशी विनंती केली. यावेळी भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here