मूल : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्थानिक सेंट अँन्स काँन्व्हेंट येथे विविध स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.
चार दिवसाच्या कला महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्यकला, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी कलेचा अविष्कार सादर केला. पार पडलेल्या स्पर्धेचे मुल्यांकन तज्ञ परीक्षका व्दारे करण्यात आले. कला महोत्सवाची सांगता आनंद मेळावा आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रदर्शनीने झाले. विद्यार्थी आणि पालकांनी पार पडलेल्या आनंद मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला. पार पडलेला चार दिवसीय कला महोत्सवा प्राचार्य रेव्ह.सिस्टर सँलेट सँबेस्टीयन आणि व्यवस्थापिका रेव्ह. सिस्टर लिली सँबेस्टीयन यांचे मार्गदर्शनात शिक्षक केशव ठाकरे, सीमा बोकारे, मयूर कामडे, अमोल कामीडवार, लालाजी बावने अर्शद अन्सारी, प्रतीक नागरेचा, एस्टर अझीम, किरण चौधरी, राखिता नागोशे चेतना रेकलवार, स्वाती मद्रिवार, नयना लाटेलवार, रेखा वाडगुरे, ज्योती चटारे, स्वाती अलगमवार, आदी शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. पाहुण्यांचे व सर्व उपस्थितांचे आभार धनराज कुडे यांनी मानले.