मूल : येथील संस्कार कलश महिला मंच यांच्या वतीने विद्यार्थीनी करिता एक हात मदतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. किशोर वयातील मुलींवर होणारे वाढते अत्याचार बघता मुलींना सावधानतेचा इशारा म्हणून हा उपक्रम विद्यालयात घेण्यात आला. आयोजित कार्यक्रमात नागपूर येथील कवियत्री प्राध्या. सौ. विजया मारोतवार यांनी या वयात कसे भुरळ पडते, मुली कोणाच्या प्रवाहात कशा पडतात, या वयात मोबाईल फोन येवढ महत्त्वाचं आहे का ? मुलींच्या बाबतीत हे प्रकार कसे व का घडतात यावर सखोल उदाहरणासह मार्गदर्शन केले. आयोजित कार्यक्रमात संस्कार कलश महिला मंचच्या सौ. जयश्री चन्रनुवार, माजी नगराध्यक्ष सौ.रत्नमाला भोयर, प्रा.डाँ. राजश्री मुस्तीलवार, मुख्याध्यापिका सौ.मंगला सुंकरवार, मुख्याध्यापिका सौ.सुनीता बुटे, माजी नगरसेविका सौ. प्रभा चौथाले, संजीवनी वाघरे, श्वेता चिंतावर, सौ.वासेकर, सौ.पोकडे, सौ.विरगमवार आदी उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले, व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे संचलन सौ. संजीवनी वाघरे यांनी तर आभाप्रदर्शन सौ. अर्चना बेलसरे यांनी केले.यावेळी
विद्यालयातील, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.