मूल – तालुक्यातील बोरचांदली येथे आदिवासी समाजाच्या वतीने जननायक स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती जि. प शाळेच्या प्रांगणात नुकतीच पार पडली.आदिवासी विचारवंत प्रियदर्शन मडावी यांचे हस्ते उदघाटन पार पडले. अध्यक्ष म्हणून सरपंच ललिता सेमस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच हरिभाऊ येनगंटीवार, पोलीस पाटील संघटनेचे मुल तालुकाध्यक्ष गोपाल ठिकरे, टोलेवाही येथील पोलीस पाटील संगीता चल्लावार, भेजगाव येथील पोलीस पाटील तथा पत्रकार शशिकांत गणवीर, मरेगाव येथील पोलीस पाटील पुंडलिक जवादे ग्रामपंचायत सदस्य नाशिकेत खोब्रागडे, कपिल मेश्राम, उषा दुर्गे, सपना रत्नावार, बौद्ध समाजाचे अध्यक्ष राजू वाकडे, प्रभाकर बोलीवार पोलीस पाटील बालाजी कुलसंगे, चंद्रशेखर येरमे मुख्याध्यापक आशा जोगी आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात उद्घाटक प्रियदर्शन मडावी यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना या देशातील जल जंगल जमीन ही आदिवासींचीच असून देशातील जंगलाचे संरक्षण आदिवासींनी केले आहे. आदिवासींना फार मोठी वैभवशाली संस्कृती आहे. आदिवासी देशातील मूलनिवासी आहेत. मात्र त्यांना उपरे वनवासी असं भासवून आदिवासींची अवहेलना केली जाते. आदिवासींच्या जमिनीवर ब्रिटिशांनी हक्क गाजवत असल्याने बिरसा मुंडा यांना आंदोलन करावं लागलं व त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन देशासाठी शहीद झाल्याचा प्रतिपादन मडावी यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन व प्रास्ताविक बोरचांदली येथील पोलीस पाटील दशरथ मडावी तर आभार शामराव मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता भाऊरावजी मडावी, सुखदेव मट्टे, दिलीप कोळापे, आकाश कुसराम, पांडुरंग कुसराम, अरुण मडावी, मनोज मट्टे, हरिभाऊ टेकाम, बंडूजी मट्टे, आदींसह आदिवासी बांधवांनी अथक परिश्रम घेतले.