निक फार्मा कंपनीचे प्रविण मराठे यांचे निधन

111
  • मूल : स्थानिक निक फाॅर्मा कंपनीचे संचालक प्रविण नारायण मराठे यांचे सकाळी निधन झाले. शांत, संयमी, होतकरू आणि उत्साही व्यक्तीमत्व म्हणून प्रविण मराठे ५२ वर्षे मित्र परिवारात परिचीत होते. नेहमी प्रमाणे सकाळी चंद्रपूर मार्गावर फिरायला जाणा-या मंडळींना प्रविण मराठे मार्गाच्या कडेला पडलेले दिसले. आरोग्याला जपणारे प्रविण मराठे व्यायामाच्या निमित्याने चंद्रपूर मार्गावर नियमित फिरायला जाणारे होते त्यामूळे फिरायला जाणा-या मंडळींचे ते परिचीत होते. नेहमी प्रमाणे फिरायला गेल्यानंतर मार्गाच्या कडेला प्रविण पडलेले दिसल्याने लागलीच त्यांना स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले. फिरून परत येत असतांना अचानकच्या एखादया घटनेमूळे त्यांना हृदयविकाराचा तिव्र धक्का बसला असावा. अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. स्व. प्रविण मराठे यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मूली, एक भाऊ व एक बहिण असा मोठा परिवार आहे. प्रविण हा कुटुंबातील कर्ते आणि जबाबदार व्यक्ती होते त्यामूळे त्यांच्या अकाली निधनाने परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मूल टुडे तर्फे स्व. प्रविण मराठे ह्यांना भावपुर्ण श्रध्दांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here