मूल : अवैद्यरित्या कोंबडयांची झुंज लावून त्यावर पैश्याची बाजी लावून हाजजितचा जुगार खेळतांना दोन लाखाचा ऐवज मूल पोलीसांनी ताब्यात घेतला असून जुगार खेळणा-या सहा जणांना अटक करून सुटका केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल येथील उपविभागीय अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे आणि ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार चिमाजी देवकाते, श्रावण कुत्तरमारे, शफीक शेख, संजय जुमनाके आणि स्वप्नील खोब्रागडे यांनी सापडा रचून पोलीस स्टेशन हद्दीतील येरगांव येथील शेतशिवारात धाड मारून दिलीप डोनुजी निकुरे रा.चिमढा, पुनेश्वर कवडू नागोसे, रा. चितेगांव, प्रमोद हरीचंद्र गावतुरे रा. हळदी, मारोती चरणदास पिंपळे रा. हळदी आणि सुधीर मधुकर मुनगंटीवार रा. हळदी या सहा जणांना ताब्यात घेवून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांचे पासून ३ कोंबळे, नगदी २७०० रूपये, ४ मोबाईल व ४ मोटार सायकल असा एकुण २ लाख १५ हजार ४०० रूपयाचा ऐवज हस्तगत केला असून गुन्हा दाखल केलेल्या सहा जणांविरूध्द कारवाई करून जामीनावर मुक्तता केली आहे.