आमचं गाव आमचा विकास, मूल येथे पार पडली सरपंच आणि सचिव यांची कार्यशाळा

105

मूल –  पंचायत समिती मूल येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२२-२३ अंतर्गत आमच गाव आमचा विकास या उपक्रमातंर्गत तालुक्यातील सरपंच आणि सचिव यांची तालुकास्तरीय दोन दिवसीय कार्यशाळा पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्ष स्थानी संवर्ग विकास आधिकारी देव घुनावत होते. सहायक गटविकास अधिकारी सुनिल कारडवार यांचे हस्सते कार्यशाळेचे उदघाटन झाले. कृषी अधिकारी किशोर चौधरी, विस्तार अधिकारी पुप्पलवार,  प्रवीण प्रशिक्षक संदीप सुखदेवे, रामटेके,  पाचभाई यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसचालन विस्तार अधिकारी जीवन प्रधान यांनी केले. या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व सरपंच व सचिव उपस्थित होते. कार्यशाळेत सहभागी सरपंच सचिव यांनी गावकऱ्यांच्या लोक सहभागातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण जनतेला करुन देण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन व सहकार्य करावे असे मार्गदर्शन गट विकास अधिकारी देव घुनावत यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना करिता पंचायत विभागाचे प्रमुख जीवन प्रधान आणि गट समन्वक हर्षवर्धन गजभिये  यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here