रान मेवा आरोग्यासाठी नव संजिवनी – तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, मोहफुलापासुन विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम

97

मूल – मोहफुल हे कल्पवृक्ष असुन त्यापासून विविध व्याधीवर उपचार करण्यासाठी केला जातो माञ आदिवासी बहुल भागातील जनतेला यांची माहिती नसल्याने विविध आजारांचा सामना करावा लागतो. यासाठी मोहफूल या बहुगुणी पदार्थाचे जतन करून आपल्या जीवनाला कलटणी द्यावी व मोह फुलासारखे अनेक आरोग्यासाठी लाभ दायक असलेला रानमेवा जतन करण्याची गरज असल्याचे मत मूल चे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांनी मूल तालुक्यातील काटवन येथे आयोजीत कार्यक्रमात उद्घाटन पर मार्गदर्शकपर भाषणात केले.

आदिवासी बहुल गावातली महिलांना मोहफुलापासुन तयार करण्यात येत असलेल्या पदार्थाची माहिती व्हावी जेणेकरून आरोग्यासाठी त्याचा उपयोग करता येईल या उद्देशाने जनकल्याण शिक्षण संस्था मूल च्या वतीने मोह फुलापासून विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काटवनच्या सरपंचा वंदना पेंदोर होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बालाजी आर्युवेदाचे डॉ. आर. एल. परचाके, प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार ओंकार ठाकरे, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे , उपसरपंच रजत सिडाम, जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम, ग्राम पंचायत सदस्य प्रेमदास गावंडे, मनोज वाडगुरे , नल्लू घोडाम , ग्रामसेवक सूरज आकनपल्लीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शक डॉ. आर. एल. परचाके यांनी मोहफुलापासुन विविध आजारांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात येणारी उपचार पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ताप, सर्दी, खोकला, कावीळ, मूळव्याध, बि.पी., शुगर, कोलोट्रार नियंत्रण, वातरोग आदीवर सविस्तर माहिती दिली. मोह फुलाच्या झाडाच्या सालीपासून असणारे उपयोग प्रत्यक्षपणे प्रात्यक्षिकद्वारे महिला बचत गटांच्या करून दाखविले. यावेळी आदिवासी महिलांनी साविस्तर आत्मसात केले.कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे संचालक बंडू अल्लीवार तर उपस्थितांचे आभार शशीकांत गणवीर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी ग्रामसंघ करवण,ग्रामपंचायत काटवन व जनकल्याण संस्थेचे अमोल वाळके, रवि वाळके व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here