मूल येथे साजरी होत आहे श्री गुरूनानक जयंती

110

मूल – स्थानिक सिंधी पंचायत चे वतीने श्री गुरुनानक देव यांची ५५३ वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. चंद्रग्रहणामूळे सकाळी ५.३० ते ८ वा.पर्यंत स्थानिक झुलेलाल मंदिर मधुन समाजाच्या महिला पुरुष, बालगोपाल आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने हातात भगवी पताका घेवुन श्री गुरूनानक देवाचा जयघोष करत शहराच्या मुख्य मार्गाने मिरवणुक काढली. उर्वरित कार्यक्रम सायंकाळी चंद्रग्रहणानंतर भजन कीर्तन व गुरुनानक देव यांचा जन्मोत्सव रात्री १.०५ मिनिटांनी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. समाजाचे दैवत श्री गुरूनानक यांच्या जयंती निमित्य स्थानिक झुलेलाल मंदिराला मोठ्या प्रमाणात रोषनाई करण्यात आली आहे. जयंती सोहळा यशस्वी करण्याकरीता स्थानिक सिंधी पंचायतचे अध्यक्ष अमर आयलानी, पदाधिकारी मोतीलाल टहलियानी, विष्णू उधवानी, किशोर केशवानी, मोहन खञी, जगदीश उदासी राजेश गुलानी, सुरेश खियानी, दीपक चुगानी यांचेसह समाजाच्या इतर युवक व महिला प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here