उमेदच्या अन्नपूर्णा उपहार गृहात गढूळ पाण्याचा वापर

73
उमेदच्या अन्नपूर्णा उपहार गृहात गढूळ पाण्याचा वापर
कसा होणार स्वच्छ भारत?

मूल :- महाराष्ट राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत चालविण्यात येणा-या अन्नपूर्णा उपहार गृहात गढूळ पाण्याचा वापर करीत असल्याचे उघडकीस आले आहे.हे उपहार गृह मूल पंचायत समितीच्या आवारात चालविले जात आहे.या गंभीर प्रकाराकडे गटविकास अधिकारी आणि उमेदचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.मूल पंचायत समितीच्या आवारात महाराष्ट राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद संचालित राष्टीय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत अन्नपूर्णा उपहार गृह चालविल्या जाते.सदर उपहार गृह अन्नपूर्णा कॅटर्स उत्पादक गट मारोडा यांचे कडे आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात येणारा लाभार्थी तसेच कर्मचारी पैसे देवून  चहा पाणी नास्ता झुनका भाकर तसेच जेवणांचा लाभ उठवितात. जेवणासाठी पिण्याचे पाणी म्हणून कॅनचे पाणी वापरतात आणि हात धुण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करतात. गढूळ पाणी पंचायत समितीच्या आवारात असलेल्या एका  बोअरवेल आणण्यात येत असल्याचे येथील काम करणा-या महिला सांगतात. हात धुण्यासाठी गढूळ पाणी आणि पिण्यासाठी कॅनचे पाणी वापरतात तर स्वयंपाकासाठी कोणते पाणी वापरत असतील याविषयी संशय व्यक्त केल्या जात आहे. एकीकडे भारत सरकार स्वच्छतेवर अधिक जोर देत आहे.केंद्र आणि राज्यात  सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविल्या जात आहे.एक कदम स्वच्छता की और असे भारत सरकारचे स्वच्छतेच्या बाबतीत वाक्य असताना या उपक्रमालाच उमेद हरताळ फासत आहे.चक्क पंचायत समितीच्या आवारातच चालविणा-या अन्नपूर्णा उपहार गृहात गढूळ पाण्याचा वापर होत असल्याचे उघडकीस आल्याने या गंभीर प्रकाराबददल संताप व्यक्त केल्या जात आहे. स्वच्छ पाणी वापरणे हे कर्तव्य असताना गढूळ पाणी उपहार गृहात कसे काय वापरल्या जाते याविषयी प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.याकडे संबधित अधिकारी आणि उमेदचे दुर्लक्ष होत आहे. याविषयी गटाच्या महिलांना विचारले असता त्यांनी आम्ही गढूळ पाण्याचा उपयोग हात धुण्यासाठी आणि भांडे स्वच्छ करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here