मोदी सरकारने केलेला नोटाबंदिचा कायदा चुकीचा ठरल्याने उद्योग धंदे गेले, तरुण बेरोजगार झाले
मुल काँग्रेस तर्फे काळा दिवस पाळून जाहीर निषेध
मूल – केंद्रातील भाजपचे मोदी सरकार ६ नोव्हेंबर रोजी नोटा बंदीचा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे देशातली अर्थव्यवस्था कोलमडली त्यामुळे उद्योग धंदे गेले लाखो तरुण बेरोजगार झाले करीता ६ नोव्हेंबर हा दिवस देशात काळा दिवस पाळून मुल तालुका ,शहर काँग्रेस,युवक काँग्रेस तर्फे काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात गांधी चौक मुल येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळा दिवस धरणे आंदोलन करण्यात आला. मोदी सरकारच्या दडपशाहीने देशाची अर्थ व्यवस्था ढासळली आणि लाखो तरुण बेरोजगार झाले. याला जबाबदार मोदी सरकार आहे. या निर्णयाचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार हाय हाय, असे नारे देऊन काळ्या फिती लाऊन जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी तालुका काँग्रेस माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्यामजी येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष,माजी न.प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार, माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष किशोर घडसे, नवनियुक्त तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले, राज्य ओबीसी काँग्रेस सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेडीवार शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, कोसंबी सरपंच रवींद्र कामडी, ग्रामीण युवा नेते प्रशांत उराडे, सुरेश फुलझेले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, कैलाश चलाख, अतुल गोवर्धन, मनोज दामल्लीवर यांचे सह शहर व ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.