धार्मिक वातावरणात संपन्न झाला बुध्दगिरीचा वर्धापन दिन सोहळा

132

मूल: अखिल भारतीय भिक्खु संघ शाखा मूलच्या वतीने बुध्दगिरीचा १८ वा वर्धापन दिन आणि भिक्खु संघवंश थेरो यांचा १६ वा वर्षापास समाप्ती महोत्सव नुकताच संपन्न झाला. चंद्रपूर मार्गावरील बुध्दटेकडी वर संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट प्रदेश भिक्खु संधाचे सचिव तथा विपश्यना आचार्य डाॅ. भदंत सुमनवन्नो महाथेरो होते. यावेळी भिक्खु आनंद थेरो, भिक्खु नंद थेरो, भिक्खु सुमंगल, भिक्खु रत्नमनी, भिक्खु मैद्वी बोधी, भिक्खु धम्मप्रकाश संबोधी आदि मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनाची सुरूवात ध्वजारोहणाने झाली. आयोजक भिक्खु संघवंश थेरो यांनी बुध्दगिरीच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात भिक्खु संघाकडून शिलग्रहण, सुर्यपठण, धम्म देसना आदि कार्यक्रम संपन्न झाले. संध्याकाळी आवाज निळया पाखरांचा बुध्द भिम गितांचा प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसाचा कुमूद रायपुरे आणि संचाचा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. वर्धापन दिना निमित्त पार पडलेल्या संपुर्ण धार्मिक कार्यक्रमाला जिल्हयाभरातील बौध्द समाज बंधु‘-भगिनी हजारोच्या संख्येनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिक्खु संघवंश थेरो यांचे मार्गदर्शनात काजु खोब्रागडे, विनोद निमगडे, शम्मी डोर्लीकर, पुरूषोत्तम साखरे, सुजीत खोब्रागडे, अतुल गोवर्धन, बालु दुधे, संतोष घुटके, अजय रंगारी, अनिकेत वाकडे, विशाल बंसोड, ऋतीक शेंडे, पुजा रामटेके, गिता देवगडे, सपना लाकडे, यशोधरा वाकडे, संध्या भोसले, शोभा गेडाम, रूपाली गोवर्धन, अंकीता खोब्रागडे आदिंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here