मूल: स्थानिक संजीवनी महिला नागरी सहकारी पत संस्थेची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच संपन्न झाली. कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी आयोजीत केलेल्या आमसभेच्या प्रारंभी संस्थेच्या दिवगंत संचालीका माया दिलीप चिताडे यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. त्यानंतर झालेल्या आमसभेत ज्योती सुरेश देशमुख यांची अध्यक्ष तर वैशाली प्रविण चेपुरवार यांची उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी राहुल कोमावार यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर केल्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यांत आले. संस्थेची आमसभा आणि कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल शेलेकर यांनी सहकार्य केले.