सार्वजनिक बांधकाम विभाग अॅक्शन मोडवर

113
सार्वजनिक बांधकाम विभाग अॅक्शन मोडवर
29 शेतक-यांमुळे अडकला बायपास रस्ता
शेतजमिन भूसंपादन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवाहन
शेतक-यांचे होवू शकते मोठे आर्थिक नुकसान
मूल :- विनायक रेकलवार

29 शेतक-यांमुळे बायपास रस्ता अडकला आहे.त्यांनी अद्याप पर्यंत भूसंपादन करून दिले नाही.त्यामुळे येथिल सार्वजनिक बांधकाम विभाग आता अॅक्शन मोडवर आले आहे.29 शेतकरी भूसंपादन करण्यासाठी पुढे आले नाहीत ,तर सार्वजनिक बांधकाम विभाग नियमित भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.शेतक-यांनी आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले आहे.
भूसंपादनासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी सुदधा मिळाला आहे.त्यामुळे निधीची कमतरता नाही.संबधीत अधिकारी याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत.तरीही 29 शेतकरी पुढाकार घेतांना दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांचेच मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने बोलून दाखविले आहे.शहरामधून जाणा-या जड वाहनांची संख्या अधिक वाढल्याने लोकप्रतिनीधींकडे बायपास करण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार कर्मवीर महाविदयालयाच्या  डोंगरी पासून तर मूल स्मशानभूमीजवळील चर्चपर्यंत 6.171 किलोमिटर बायपास रस्ता मंजूर झाला.यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. भूसंपादनाच्या प्रक्रियेतील 87 शेतक-यांपैकी 48 शेतक-यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.लवकरच दहा शेतक-यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.परंतु 29 शेतक-यांच्या उदासिनतेमुळे पुढील भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे.बायपास रस्त्यासाठी 16.45 हेक्टर शेतजमिन भूसंपादन करण्याची प्रक्रिया मागिल दोन वर्षांपासून सुरू आहे. या बायपास रस्त्याला गती मिळण्यासाठी येथिल सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठाच्या आदेशानुसार आता अॅक्शनमोडवर आली आहे.
शेतक-यांनी सहकार्य करावे
 29 शेतक-यांनी बायपास रस्त्यासाठी आपल्या शेतजमिनीचे भूसंपादन करून द्यावे. एकदा विभागातर्फे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यास शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. – श्री.प्रशांत वसूले,उपविभागीय अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,मूल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here