भ्रष्टाचार मुक्त भारत – विकसित भारत निमित्त बोरचांदली येथे सत्क्ररता सप्ताह.

95

. मुल – भारतातल्या कृभको फर्टीलायझर कंपनी मार्फत मुल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथे ३१ आकटोंबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सत्करता जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. याच सप्ताहाचे औचित्य साधून बोरचांदली परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक विकास आणि नवीन विकसित उपक्रम विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कृभको कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक मान.पियूष नेमा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित शिबिराचे प्रमुख अतिथी म्हणून हरीश सावकार येंनगंटीवार, ग्राम पंचायत उपसरपंच आणि मार्गदर्शक गुरुदास चौधरी, यांनी विकसित शेती मिळणारे उत्पन्न आणि शेतकऱ्याला लागणारा खर्च यावर विस्तृत मार्गदर्शन केले. सप्ताहाच्या उपक्रमात पशू शिबिरात आरोग्य तपासणी, प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिक, क्रीडा विषयक इत्यादी उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. असून बोरचांदली हे गाव क्रुभको कंपनीने दत्तक घेतले असल्याचे आयोजकांनी सांगितले .कार्यक्रमाचे संचालन बोरचांदली येथील आदर्श शेतकरी महेश पाटील कटकमवार यांनी केले. प्रास्ताविक अंकुश राठोड यांनी केले. आभार प्रगत शेतकरी दिनेश येनुगवार यांनी मानले. याप्रसंगी मार्गदर्शन शिबिराला परिसरातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here