मूल – आधुनिक भारताच्या पहील्या महिला पंतप्रधान भारत रत्न इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन केले. तसेच कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन व प्रार्थना केली. प्रारंभी गुरू गुरनुले यांनी इंदीराजीच्या जीवनावार आधारीत स्वरचीत गीतामधुन श्रध्दांजली अर्पण केली.
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष माजी न.प. उपाध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, सेवा सहकारी सोसायटी केळझरचे अध्यक्ष किशोर घडसे, महाराष्ट्र ओबसी काँग्रेस सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, राजू पाटील मारकवार, काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, नवंनियुक्त तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी नगरसेवक विनोद कामडे, अतुल गोवर्धन , कोसंबी सरपंच रवींद्र कामडी, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी प्राचार्य बडूभाऊ गुरनुले, शहर कांग्रेस सरचिटणीस सुरेश फुलझेले, उपाध्यक्ष संदीप मोहबे , पप्पू पुल्लावर, विष्णू सादमवार, अन्वर शेख, होड्डाजी यांचेसह ग्रामीण व शहरी कांग्रेस कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच, सदश उपस्थित होते. संतोषसिंह रावत यांनी इंदिराजी गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कार्य व विचार ग्रामीण आजच्या युवकांना ,कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यापर्यंत व कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवून ग्रामीण भागातील काँग्रेस संघटन मजबूत करावे, हीच इंदीराजींना श्रध्दांजली ठरेल. असे आवाहन संतोषसिंह रावत यांनी करेल.