काँग्रेसच्या मूल तालुकाध्यक्ष पदी गुरूदास गुरनुले यांची नियुक्ती

112

मूल : (प्रतिनिधी)
राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते गुरूदास गुरनूले यांची नुकतीच मूल तालुका काॅंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.
संभाव्य निवडणुका लक्षात घेवून पक्ष संघटना मजबुत व क्रियाशिल करण्याचे उदेशाने महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमेटीचे प्रदेश निवडणुक अधिकारी पल्लम राजु यांनी तालुका अध्यक्षांच्या निवडीच्या प्रस्तावाला दिलेल्या मान्यतेनुसार प्रदेश काॅंग्रेस कमेटीचे प्रशासन व संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी गुरूदास गुरनूले यांचे सह चंद्रपूर जिल्हयातील सोळा तालुका व शहर अध्यक्षांच्या नियुक्तीला मान्यता दिली असून जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी मान्यता दिलेल्या अध्यक्षांना नियुक्ती पत्र दयावे. असे निर्देश दिले आहेत.
नवनियुक्त मूल तालुका अध्यक्ष गुरूदास गुरनूले तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष असून क्रांतीज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अखील भारतीय माळी महासंघाचे विभागीय सहसचिव असलेले गुरूदास गुरनुले श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समितीचे क्रियाशिल सदस्य आहेत. तालुक्यातील अनेक सेवाभावी व सामाजीक संस्थांशी ते जुळलेले असून सामाजीक कार्याची त्यांना विशेष आवड आहे. त्यांची सेवाभावी वृत्ती आणि पक्षाप्रतीची निष्ठा लक्षात घेवून काॅंग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांची मूल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबदल गुरूदास गुरनूले यांनी माजी मंत्री आमदार विजय वडेटीवार, आमदार सुभाष धोटे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here