तालुका क्रीडा संकुल अंधाराततालुका क्रीडा संकुल अंधारात
पाच करोड रूपयांच्या इनडोअर गेम हाॅललाही विदयुत सेवेचा अभाव
तालुका क्रीडा अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष
संकूल परिसरात सर्पांची भिती
मूल – विनायक रेकलवार
विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाची स्थापना करण्यात आली.त्याच उददेशाला प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात आहे. संकूल आणि संकूल परिसरात नव्याने बांधण्यात आलेले इनडोअर गेम हाॅल मध्येही विदयुत सेवेचा अभाव आहे. दोन्ही ठिकाणे मागील दोन वर्षांपासून अंधारात सापडले आहे.याकडे येथील तालुका क्रीडा अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जात आहे.
क्रीडा क्षेत्रात तालुक्यातील विदयाथ्र्यांनी बाजी मारावी.राष्टीय आणि आंतरराष्टीय स्तरावर त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरावी आणि त्यांचे नाव चमकावे हा उददात्त हेतू डोळयांसमोर ठेवून मूल येथे तालुका क्रीडा संकूलाची उभारणी करण्यात आली.परंतु अधिकारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे खेळाडू घडण्याऐवजी त्याला विविध समस्यांनाच सामोरे जावे लागत आहे. संकूल परिसरात आणि इनडोअर हाॅल मध्ये विदयुत सेवेचा अभाव असल्याने विदयाथ्र्यांच्या सरावात मोठया अडचणी निर्माण होत आहे. पाच करोड रूपये खर्चून आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून सुसज्ज इनडोअर गेम हाॅल बाध्ंाणयात आले.बॅडमिंटन आणि इतर खेळ खेळण्याची सुविधा यात आहे. विदयुत फिटींग सुदधा करण्यात आली आहे. परंतु विदयुत सेवेचा अभाव असल्याने सरावात आडकाठी निर्माण होत आहे. पुढच्या महिण्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आहे.त्यामुळे बरेचसे शालेय विदयार्थी येथे वेगवेगळया खेळांच्या सरावासाठी येतात.परंतु परिसरात विदयुत सेवाच नसल्याने त्यांच्या सरावात अडथळा निर्माण होत आहे.सायंकाळी आणि रात्री सराव करणे कठिणाचे झाले आहे. अधिका-यांच्या दुर्लक्षांमुळे संकूल परिसरात कचरा आणि घाणीच्या साम्राज्यांत भर पडली आहे.त्यामुळे येथे सापांचा उपद्रव वाढले असल्याचे काही सराव करणा-या विदयाथ्र्यांनी सांगितले.सर्पाची भिती असल्याने अंधारात सराव करणे धोक्याचे झाले आहे. विदयुत सेवेला दुसरा पर्याय म्हणून येथे सौर उर्जेचे दिवे सुदधा लावण्यात आले आहे.परंतु ही सेवा सुदधा रामभरोसे झाली आहे. अधिकारी आणि संबधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षा मुळे सौर उर्जेवरचे दिवे दुरूस्तीविना ताटकळत आहेत. संकूल परिसराच्या निगराणी आणि देखरेखी साठी 48 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तरतूद आहे.परंतु ते सुदधा लावण्यात आलेले नाही.योग्य नियोजन आणि देखरेख नसल्याने नवीन बांधणयात आलेल्या इनडोअर गेम हाॅलच्या खिडकीचे काचेचे तावदाने फोडण्यात आली आहे. तालुका क्रीडा संकूलाचा संपूर्ण कारभार रामभरोसे झाला आहे.संबधित तालुका क्रीडा अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने त्याचा फटका सराव करणा-या अनेकांना बसत आहे.तालुका क्रीडा संकूलाच्या देखरेखीसाठी क्रीडा व युवक संचालनालय,पुणे यांचे कडून दरवर्षी एक लाख साठ हजार रूपयांचा निधी प्राप्त होतो.या निधीची तरतूद कोणत्या पदधतीने केल्या जाते हा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.विदयुत सेवेसाठी नवीन डीपी बसविण्यात आली आहे.नवीन मिटर ही उपलब्ध झाले आहे.मग घोडे अडले कुठे हा सवाल विदयाथ्र्यांना पडला आहे. याबाबतीत जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
शिपायाचे मानधन अडले
मानधन तत्वावर तालुका क्रीडा संकूल येथे शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु त्याचेही आठ महिण्यांपासूनचे मानधन अडविण्यात आले आहे. मानधनासाठी एक लाख रूपयांचा निधी प्राप्त होतो. मानधन न मिळाल्याने संबधित शिपायाची दिवाळी अंधारात गेली.त्यामुळे संबधित शिपायाने मानधनासाठी तालुका क्रीडा संकूलाचे कार्याध्यक्ष तहसिलदार यांच्याकडे याबाबतीत तक्रार केली आहे.
समितीचे कार्य काय?
तालुका क्रीडा संकूलाच्या योग्य कारभारासाठी तालुका क्रीडा संकूल समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीत जिल्हयाचे पालकमंत्री स्वता अध्यक्ष असतात.तहसिलदार यांच्या कार्याध्यक्ष पद असते.यात पोलिस निरिक्षक,गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,सार्वजनिक बंाधकाम विभाागाचे उपविभागीय अधिकारी यांचा समावेश असतो.समिती मध्ये वरिष्ठ अधिका-यांचा भरणा असूनही तालुका क्रीडा संकूलाकडे होणारे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.