यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रेत्यांनी केला लाखोचा धंदा

108

मूल (प्रतिनिधी)
कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षानंतर निर्बधमुक्त झालेल्या यावर्षीच्या दिवाळीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या फटाक्यांची विक्री झाली असुन काही फटाक्या विक्रेत्यांनी तर  लाखाच्या घरात फटाक्यांचा व्यवसाय केल्याचे सांगण्यात येते.
मागील दोन वर्षाचा काळ कोरॉना महामारीच्या प्रकोपत गेला. त्यामुळे लोकांनी भीतीपोटी आनंदात दिवाळी सुधा साजरी केली नव्हती. त्या तुलनेत यावर्षी कोरोनाची भीती कमी झाली आणि सगळेच सन आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. मोबाईल वरील व्हाटसअँप वरून काही पोस्ट प्रकाशित झाल्या, यंदाच्या दिवाळीत चीन मधून आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे लायटिंग आणि फटाके मोठ्या प्रमाणात पाठविली जातील, ज्याच्यामुळे मानवी जीवनावरती मोठ्या प्रमाणात त्याचे अनिष्ट परिणाम पडतील, याद्वारे पुन्हा काही नवीन वायरस पसरू शकेलं, मात्र नागरिकांनी त्याला न जुमानता बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात आल्या कोठून याची शहानिषा न करता बिनधास्त खरेदी केल्या. त्यामूळे यंदाच्या दिवाळीत घरोघरी वेगवेगळ्या प्रकारची विद्युत रोषनाई आणि घराघरात फटाक्याची आतीषबाजी होतांना दिसुन आली. त्यामुळे यवर्षीच्या दिवाळीत विद्युत लाईटिंग शिवाय क्षणीक फुटून धमाका दाखविणारे विविध प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणात नागरीकांनी खरेदी केल्याने यावर्षी अनेक फटाके विक्रेत्यांनी लाखोचा सिझनेबल धंदा केल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here