नगर परीषद बांधकाम विभागाच्या वेळकाढु धोरणाचा नागरीकांना ञास, मुख्याधिकारी पाटणकर यांचे कडून नागरीकांची अपेक्षा

132
मूल (प्रतिनिधी) बांधकामा करीता आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी कित्येक महिण्यांपासून अर्ज करूनही नगर परिषदेकडून अर्जाचा निपटारा होत नसल्याने शहरात अनेक बांधकाम खोळंबुन आहेत. यामूळे नगर परिषदे सोबतचं बांधकाम करण्यास इच्छुक असलेल्या नागरीकांचेही मोठया प्रमाणांत आर्थिक नुकसान होत असल्याने खोळंबुन असलेले बांधकामाच्या परवानगीचे प्रकरण नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी निकाली काढतील. अशी अपेक्षा शहरवासीय बाळगुन आहेत.

व्यावसायीक दृष्टया भरभराटीस येत असलेले मूल शहर सध्या स्मार्ट सिटी म्हणून ओडखल्या जाते. शिक्षणाच्या दृष्टीने शहरात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा असून बहुतांश शासकिय कार्यालयही आहेत. शिवाय प्रवास व इतर सोयींच्या दृष्टीने मूल शहर सोयीचे असल्याने नोकरदार वर्गासोबतचं व्यावसायीकांचाही कल मूल शहराकडे मोठया प्रमाणांत आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्याने मूल शहरात राहण्यासाठी भाडेतत्वावर निवा-याची व्यवस्था करणे भाग पडते. भाडेतत्वावर राहत असतांना आपलेही छोटेसे घर असावे म्हणून शहरातील विषेशता नोकरदार वर्गाने पैश्याची जुळवा जुळव करून जागा खरेदी केली. खरेदी केलेल्या जागेवर घराचे बांधकाम करण्यासाठी अनेकांनी बॅका आणि वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतले, घर बांधकामास सुरूवात करण्यापूर्वी नियमानुसार अनेकांनी नगर परिषदेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांसह पैसे खर्च करून आँनलाईन अर्ज केला. परंतू नगर परिषदेतील बांधकाम विभाग ना हरकत प्रमाणपत्रा साठी नियमानुसार सादर केलेल्या अर्जाची विहित मुदती मध्यें निपटारा लावत नसल्याने अनेकांचे बांधकाम खोळंबुन आहेत. घर बांधकामा करीता अनेकांनी बॅंका आणि काही वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतले असल्याने त्यांना कर्जाचा हप्ता भरणे अनिवार्य असल्याने अनेकजन घर बांधकाम सुरू करण्यापूर्वी पासून हजारो रूपयाचे कर्जाचे हप्ते भरत आहेत. कर्जाचे हप्ते भरणा-या अनेकांनी बांधकाम विभागाशी संपर्क साधला. परंतू त्यांच्या अर्जाचा निपटारा न लावता टाळाटाळी व वेळकाढून नेल्या जात आहे. त्यामूळे नगर परिषदेच्या बांधकाम विभागात सेवारत असलेल्या बाबर नामक अभियंत्या विरूध्द नागरीकांमध्यें चांगलाच रोष पसरला आहे. सदर रोषाचा उद्रेेक केव्हा होईल. हे सध्यातरी न सांगता येणारे आहे. तत्कालीन मुख्याधिकारी आणि विद्यमान प्रशासक यांनी अभियंता बाबर यांना प्रलंबीत असलेल्या प्रकरणांचा निपटारा लावण्यासाठी अनेकदा सुचना केल्या. परंतू बाबर यांचा संधीसाधुपणात कोणतीही सुधारणा झालेली नाही. अभियंता बाबर यांच्या कामाच्या पध्दतीचा नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनाही त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामूळे नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी पाटणकर अभियंता बाबर यांच्या कार्यपध्दतीवर ठोस निर्णय घेवून प्रलंबीत असलेल्या नाहकरत प्रमाणपत्राचा तिढा सोडवून नगर परिषदे सोबतचं नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करणा-या नागरीकांचे आर्थिक नुकसान थांबवतील. याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here