मूल : स्थानिक श्री माँ दुर्गा मंदीर प्रांगणात योग नृत्य परीवार मूलच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षीका सौ. मिराताई शेंडे यांनी सहकारी वैशाली बोकारे आणि वैशाली काळे यांच्या सहकार्याने उपस्थित महीला आणि पुरूष यांना योगाचे महत्व पटवुन देत विविध योगाचे सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वय समितीच्या आरती चेपुरवार, शामलता बेलसरे, लिना जंबुलवार, समता बंसोड, रंजना चौधरी, सुनिता नेरल यांनी सहकार्य केले.
शूरवी महिला महाविद्यालय मूल
स्थानीक शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य यावेळी हर्षा खरासे यांचे मार्गदर्शनात महाविद्यालयातील
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सकाळी आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष कापर्तीवार व सचिव सुरावार यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या हॉलमध्ये विविध योगासने करण्यात आली. प्राचार्या हर्षा खरासे मॅडम यांनी आपल्या संबोधनात ‘करा योग राहा निरोग चा संदेश देतांना योगासनांचे महत्त्व पटवून दिले. प्रा. सौरभ तरारे यांनी सर्वांचे आभार मानले.