आमदार होण्यापुर्वीच आमदारकीचा तोरा, पञकाराला पाहुन घेण्याची दिली धमकी

21

मूल : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या हवश्या गवश्या नवश्याच्या चढाओढीत आमदार होणारचं असा दावा काँग्रेसच्या एका नेत्याने केला असून आमदार झाल्यानंतर पहिले काम आपल्या परिवाराला संपवेन. अशी धमकी एका पत्रकाराला दिल्याची घटना नुकतीच तालुक्यात घडली.  एक प्रादेशिक वृत्तपत्र आणि न्युज पोर्टलवर विधानसभा निवडणुकीची बातमी प्रसारीत झाली. बातमी प्रसारीत होताच काॅंग्रेसने उमेदवारी दयावी म्हणून खटाटोप करणा-या तालुक्यातील एका नेत्याने संबंधीत पत्रकाराला मोबाईल वरून शिवीगाळ केली, एवढचं नव्हे तर मी आमदार होणारचं असे चँलेज देत मी साधा दिसत असलो तरी फार वाईट आहे. म्हणत आमदार झाल्यानंतर पहिले तुझा परिवाराला संपवेन. अशी धमकी दिली. उमेदवारीसाठी दारोदार भटकत असलेल्या काँग्रेसच्या एका नेत्याने पञकाराला धमकी दिल्याची चर्चा होताच सदर घटनेमूळे तालुक्यातील शेकडो काॅंग्रेस कार्यकर्त्यामध्ये हश्या पिकल्या आहेत. तालुक्यातील मूळ रहीवाशी असले तरी लांब राहुन निवडणुकीच्या ऐन तोंडावर तालुक्यात वास्तव्यास येणारे सदर नेते काॅंग्रेस मध्यें चर्चेचे आहेत. जिल्हा परिषदेतील महत्वाच्या पदासोबतच एका मंडळाचे सदस्यपद भुषविलेला सदर नेता सध्या काॅंग्रेसवासी असला तरी सदर नेत्याने काही काळ राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी मध्येही घालवला आहे. जुन्या सावली विधानसभा मतदार संघातून पराभुत होण्याचा अनुभव असलेल्या सदर नेत्याच्या बंडखोरीमूळे त्यावेळेस काॅंग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. असा इतिहास असलेला हा नेता नेहमी नेते आणि कार्यकर्त्याच्या भेटीचे फोटो समाज माध्यमावर प्रसारीत करून भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टीने भविष्यात होणा-या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी दयावी. म्हणुन आदळ आपट करीत असतो. मानसिक दृष्टया तयार नसतांना पक्षादेश पाळून लोकसभा निवडणुक लढविणारे भाऊ पराभुत झाले असले तरी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कंबर कसुन मैदानात उतरणार आहेत. दिग्गज आणि वजनदार नेते म्हणून सर्वपरिचीत असलेल्या भाऊंच्या विरोधात निवडणुक लढविण्यास अनेकजण इच्छुक असले तरी त्यांचे विरूध्द लढत देण्यासाठी तेवढयाच तोलामोलाचा सर्वमान्य उमेदवार असावा. अशी सर्वसामान्यांमध्यें चर्चा आहे. असे असतांना ऐन निवडणुकीच्या काळात तालुक्यात भ्रमंती करून स्वतःला सक्षम व वजनदार समजून घेणा-या सदर नेत्याने आमदार होणारचं असा चॅलेज दिला आहे. त्यामूळे त्या नेत्याच्या चॅलेजची काॅंग्रेसच्या स्थानिक वर्तुळात चर्चा होत असून आधी उमेदवारी मिळवून दाखवा. मग विजयाचे काय ते पाहु. असा प्रतिप्रश्न काॅंग्रेस वर्तुळात चर्चील्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here