ईद ए मिलादच्या दिवशी घडले शहरवासीयांना शांततेचे दर्शन

9

मूल : ईद ए मिलाद सण स्थानिक मुस्लीम बांधवांकडून मोठया उत्साहाने साजरा करण्यांत आला. सकाळी 9 वाजता मस्जीद कमेटीचे अध्यक्ष अँड. दाऊद शेख, सचिव गुलाब पठाण, बबलु कुरेशी, मोहसीन पठाण, असलम शेख, रेहान शेख आणि तौसीफ सैयद यांचे नेतृत्वात मस्जीद समोरून मुस्लीम बांधवांनी मिरवणुक काढली. मिरवणुकीत मोठया संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. स्थानिक गांधी चौकात हिरवी पताका फडकवत फुलांची उधळण केली. शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण केलेल्या मिरवणुकीचा समारोप मस्जीद मध्यें झाला. ईद ए मिलादच्या दिवशी शहरात श्री माता कन्यका परमेश्वरी मंदिराचा शुभारंभ आणि मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. सोहळयाला विशेष अतिथी म्हणून अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचे उपस्थितीत सोहळयाचे निमित्याने शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यांत आले होते. ईद ए मिलाद निमित्य मुस्लीम बांधवाची आणि प्राणप्रतिष्ठा सोहळया निमित्य मंदिर समितीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. मंदिर आणि मस्जीद एकाच मार्गावर शिवाय शोभायात्रेची वेळही सारखीच असल्याने पोलीस प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला. परंतू शहरातील मुस्लीम आणि हिंदु बांधवांनी सामजस्याची भूमीका स्विकारत पोलीस प्रशासनाला सहकार्याचा हात दिला. 9 वाजता मुस्लीम बांधवांनी मिरवणुक काढल्यानंतर 9.15 वाजताचे सुमारास मंदिर समितीची शोभायात्रा राज्याचे वने मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आणि सपना मुनगंटीवार यांचे नेतृत्वात निघाली. मोठया संख्येने सहभागी असलेल्या दोन्ही मिरवणुका गांधी चौकामधून वेगवेगळया मार्गाने मार्गक्रमण करीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या. मिरवणुक काळात कोणतीही अडचण येवू नये, शांतता प्रिय मूल शहराची शांततेची परपंरा कायम ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत आणि ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मिरवणुक काळात शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here