बहुजन समता पर्व व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर च्या माध्यमातून चिचपल्ली येथे भव्य रोगनिदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन

20

मूल : मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिचपल्ली येथील तलावाची पाळ फुटून शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व आरोग्य सुध्दा धोक्यात आले. यांची दखल घेत इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर व बहुजन समता पर्व जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष तथा चंद्रपूर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.संजय घाटे यांनी प्रत्यक्षात बाधित नागरिक व ग्रामस्थांशी चर्चा करून आरोग्य शिबीराच्या आयोजनाची ग्वाही दिली. त्यानुसार आज सतत पाऊस सुरू असताना दिलेल्या शब्दाला जागत अवघ्या दोन दिवासात इंडियन मेडिकल असोसिएशन, बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन केले. यावेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आली. शिबीराचे उद्घघाटन चिचपल्लीच्या सरपंचा पपीता कुमरे यांच्या हस्ते झाले. बहुजन समता पर्वाचे डॉ. संजय  घाटे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख  विजय नागापुरे, चंदन उंचीवर, शुभम दुर्योधन, शुभांगी सातारकर, रविंद्र सुत्रपवार, पुष्पा गेडाम, चरण कुमरे, रिना भडके आदी ग्रा. प. सदस्य उपस्थित होते. शिबिरामध्ये नागरिक व ग्रामस्थांची तपासणी करीता चंद्रपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मनिषा घाटे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. मनीषा वासाडे, डॉ. ऋजुता मुंदडा, आय एम ए सचिव डॉ. प्रवीण पंत, फिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे,  हृदयरोग तज्ञ डॉ. अमित ढवस,  अस्थीरोग तज्ञ डॉ. अजय वासाडे, सर्जन डॉ सुश्रुत भुक्ते आदी उपस्थित होते. शिबीराचे आयोजन करण्यासाठी अविनाश मेश्राम, प्रसून दुर्योधन, विजय वनकर सर, दिपक रामटेके, देवानंद झाडे, वाल्मीक मांढरे, उमेश दुर्योधन, राजु हजारे, अरूण बावणे, बाळू दुर्योधन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सतत पाऊस सुरू असतानाही शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. संततधार पाऊस आणि तलावाची पाळ फुटून सर्वञ अस्वच्छता पसरली. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेवुन नागारीकांच्या सेवेसाठी डाँ. संजय घाटे यांनी पुढाकार घेवुन आरोग्य शिबीराचे आयोजन करून नागरीकांना दिलासा दिला. याबद्दल चिचपल्ली आणि परिसरातील नागरिकांनी डाँ. घाटे आणि सहकारी जणांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here