चिचपल्ली पिंपळखुट येथील नागरिकांना संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने ब्लँकेट वाटप व भोजन दान

22

मूल – मागील सहा दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिचपल्ली येथील तलावाची पाळ फुटून दोनशे नागरिकांच्या घरात पानी शिरले. त्याम्ळे गरीब नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरातील जीवनावश्यक वस्तु, भांडे, धान्य आदी साहित्याचे नुकसान झाले. याची दखल घेवुन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि.प. चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी प्रत्यक्ष बाधित नागरिकांची व ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार २७ जुलै रोजी भर पावसात चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे जावुन नागरिकांची भेट घेवुन स्वखर्चाने ब्लँकेटचे वितरण आणि भोजन दान दिले. यावेळी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गंगाधर वैद्य, माजी जि.प. सदस्या मंगला आत्राम, सामाजिक कार्यकर्ते मधुकर मेश्राम, जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर, कृषी बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, मूल शहर अध्यक्ष सुनील शेरकी, महिला कांग्रेस सचिव शामला बेलसरे, सरपंच पपिता कुमरे, उपसरपंच चंदन उंचेकर, सदस्य रवींद्र सुत्रपवार, विजय नागपुरे,बाळु दुर्योधन, अमोल गेडाम,प्रसन्न दुर्योधन, पालक झाडे, संजय म्याकलवार, नारायण खापने, विनोद मेश्राम, श्रीकृष्ण जुमनाके, अशोक जुमनके, बिरशा गेडाम, धनराज दडमल व चीचपल्ली पिंपळखुट गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here