तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची मागणी

27

मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई दयावी. अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा काॅंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांचे मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने मागील चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील मामा तलाव फुटला. त्यामूळे तलावाखाली असलेल्या जवळपास पस्तीस शेतक-यांच्या शेतातील पीक वाहून गेल्याने मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे. यामूळे तलावाखालील सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कुटूंबाचे उदरनिर्वाह भागवायचे कसे ?असा प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला आहे. अश्या परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने आर्थिक सहकार्य करावे. अशी मागणी केली आहे. पाठविलेल्या निवेदनात तलावाची फुटलेली पाळ त्वरीत बांधण्यांत यावी, शेतात वाहुण आलेल्या रेती व मातीचा उपसा करून शेतीची दुरूस्ती करून दयावी, नुकसानग्रस्त शेतक-यांचे चालु वर्षाचे पीक कर्ज पुर्णता माफ करावे, आदि मागण्यांचा समावेश आहे. सदर मागण्यांचे निवेदन देतांना संतोषसिंह रावत यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, काॅंग्रेेसचे जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, खरेदी विक्री संस्थेचे सभापती पुरूषोत्तम भुरसे, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, संदीप कारमवार, अखील गांगरेड्डीवार, युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरू चौधरी, माजी नगरसेवीका लिना फुलझेले, फरजाना शेख, शामला बेलसरे, सिमा भसारकर, काॅंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बंडु गुरनूले, हसन वाढई, संदीप मोहबे, अतुल गोवर्धन, अभय चिटलोजवार, विष्णु सादमवार, रोशन भुरसे, रूपेश निकोडे यांचेसह दाबगांव येथील नुकसानग्रस्त पस्तीस शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here