मुल नगरातील अनेक घरात पावसाचे पाणी, अनेक कुटुंब उघड्यावर, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी – संतोषसिंह रावत

23

मूल – मागील तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामूळे मूल शहरातील अनेक भाग जलमय झाले आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागारीकांना ञास सहन करावे लागत आहे. शहरातील वार्ड क्र. १५,१६ आणि १७ मधील नागरीकांना प्रत्येक पावसाळ्यात पाण्यामूळे ञास सहन करावा लागत असल्याने नागरीकांमध्ये प्रशासन विरूध्द रोष व्यक्त केल्या जात आहे. नागरिकांनी नगर प्रशासन व बांधकाम विभागाला अनेकदा विनंती केली. परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनने कार्यवाही न केल्याने प्रत्येक पावसाळ्यात नागरीकांना ञास सहन करावा लागत आहे. दुर्गा मंदिर लगतच्या तलावाच्या मागील भागात डी.पी.रोड लगत वास्तव्यात असणारे रवींद्र उराडे, वर्षा रामटेके, ललिता मेश्राम, शुभम अवतरे, काजल दुधे, सीमा भसारकर तर दुर्गा मंदिर समोर राहणारे प्रफुल म्याँकलवार, अमित मंकिवार, रामदास गुरनुले, बंडू चौधरी, अनिल कोठारे, सोनू नान्हे, प्रकाश भोयर, लक्ष्मण श्रीगीरीवार यांच्या घरात पाणी शिरल्याने सामान निकामी झाले. घरातील पाणी बादलीने फेकण्याचा प्रसंग यांचेवर ओढवला आहे. मूल शहरातुन गेलेल्या महामार्गाच्या बाजुने बांधलेल्या नालीचे काम निकृष्ठ व दोषपुर्ण झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणुन पुरस्कार प्राप्त असलेले मूल शहर नगर प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे पाण्यावर तरंगणारे शहर म्हणुन ओडखले जाणार आहे. नगर परीषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता यांना पावसाळ्यात निर्माण होणारी परीस्थिती अवगत करून दिल्यानंतरही नियोजनबध्द काम न करता थातुर माथुर केल्या जात असल्याने त्याचा फटका शहरवासियांना बसत आहे. अंतर्गत नाल्या व गटारांची नियमित स्वच्छता होत नाही.पाण्याचा निचरा होण्याचे दृष्टीने शहरातून गेलेला महामार्गावर तिन ते चार ठिकाणी फोडून मोठया व्यासाचे पाईप टाकल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु तेही काम करण्यात न आल्याने प्रत्येक पावसाळ्यात शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरत असल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची ओरड नागरीकांमध्ये ऐकायला मिळत आहे.

नगर व महसुल प्रशासनाने शहर व तालुक्यातील पुरपरिस्थितीची पाहणी करवी. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त नागारीकांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.

संततधार झालेल्या पावसाचा फटका दोन व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला बसला. शहरातील निवृत्त शिक्षक गरपल्लीवार आणि श्रीमती तेलतुंबळे यांचे वृध्दापकाळाने काल निधन झाले. त्यामूळे त्यांचेवर उमानदी काठावर बांधलेल्या मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करावयाचे होते. परंतु उमानदीला आलेल्या पुरामूळे मोक्षधाम येथे जाणारा मार्ग बंद झाला. त्यामूळे स्व. गरपल्लीवार यांचेवर शहरापासुन ५ कि.मी.अंतरावर असलेल्या चिंचाळा येथे तर श्रीमती तेलतुंबळे यांचेवर चामोर्शी मार्गाच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here