संततधार पावसामूळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत, सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

27

मूल : काल पासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूल तालुक्यातील अनेक नदी आणि नाल्यांना पुर आला आहे. तालुक्यातील अनेक घरांमध्ये आणि मूल शहरातील अनेक वार्ड आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाल्याने अनेक कुटूंबाचे बेहाल झालेआहे. पोलीस स्टेशन मुल हद्दीत येणाऱ्या नदी आणि नाले तुडूंब वाहत असुन अनेक सकल भागात पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. मूल ते चंद्रपूर मार्ग आगळी जवळील तलावाचे पाणी महामार्गावर आले असुन अंधारी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मूल चंद्रपूर मार्गावरील वाहतुक बंद आहे. जानाळा ते सुशी जाणारा मार्गावरील चिरोली जवळील अंधारी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुशी, पोंभुर्णा मार्ग बंद आहे. मारोडा ते भादुर्णी मार्गावरील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे भादुर्णी मार्ग बंद आहे. मुल ते करवण काटवण जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे बोगदयामध्ये पाणी भरल्याने मार्ग बंद आहे. मूल-सावली मार्गावरील आकापुर जवळच्या नाल्यावर उमा नदीचे पुरा मुळे तीन ते चार फुट पाणी वाढल्यामुळे मूल सावली मार्ग बंद आहे. राजोली ते पेटगाव जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे पेटगाव मार्ग बंद झाले आहे. मुल ते राजोली ब्रह्मपुरी जाणारे रोडवरील उमा नदीच्या पुलासमोरील लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने राजोली मार्ग बंद झाले आहे. सावली तालुक्यातील चारगांव, सिंदोळा आणि साखरी मार्ग पावसामूळे बंद आहे. महसुल व पोलीस प्रशासन पुर परीस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. नागारीकांनी संततधार पाऊस आणि पुर परिस्थिती लक्षात घेवुन प्रशासनास सहकार्य करावे.,असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here