प्राथमिक शिक्षक पत संस्थेवर परीवर्तन आघाडीचे वर्चस्व, एकता आघाडीला चार जागांवर मानावे लागले समाधान

22

मूल : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पत संस्था सावलीच्या तेरा संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत परीवर्तन आघाडीने नऊ जागांवर विजय संपादन करून संस्थेवर वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. अखील पुरोगामी एकता आघाडीला केवळ चार जागांवर विजय मिळविता आला. जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या सावली आणि मूल तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी संघटीत होवून स्थापन केलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या सावलीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक 14 जूलै रोजी पार पडली. यावर्षी प्रथमचं सत्तारूढ एकता आघाडी विरूध्द विरूध्द परीवर्तन आणि सहकार आघाडयांनी दंड थोपटले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत संतोष कुंठावार, रत्नमाला गेडाम, किशोर उरकुंडवार, जयदिप दुधे, नंदकिशोर शेरकी, अमोल देठे, ओमदास तुराणकर आणि भास्कर रामटेके यांचे नेतृत्वात परीवर्तन आघाडीचे भक्तदास कांबळे, सुनिल खंडाळे, स्वप्नील डोईजड, विजय बावणे, लक्ष्मण सोयाम हे सर्वसाधारण प्रवर्गातून तर अनु.जाती/जमाती गटामधून आदेश मानकर, महिला गटामधून रजनी रामगिरवार आणि विजाभज गटामधून सुरेश जिल्हेवार यांनी विजय संपादन केला तर किशोर आनंदवार, विलास आळे, जितेंद्र लेनगुरे, पुरूषोत्तम टोंगे, नामदेव निखाडे, सुधाकर चरडुके आणि प्रब्रम्हानंद मडावी आदिंच्या नेतृत्वात रिंगणात राहीलेल्या अखील पुरोगामी एकता आघाडीचे नितीन कुनघाडकर, लोमेश बोरेवार, जीवन भोयर, सर्वसाधारण गटामधुन विजयी झाले तर महिला गटामधून वर्षा मुलकलवार हया विजयी झाल्या. प्रथमचं रिगणात उतरलेल्या प्रहार समर्थीत सहकार आघाडीला भोपळा मिळाला. निवडणुक पार पाडण्यासाठी सहायक निबंधक तुपट यांनी काम पाहले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here