नव भारत कन्या विद्यालयाची अनुष्का ठावरी तालुक्यात प्रथम तर सेंट अँन्स हायस्कुलची प्राची बावणे तालुक्यात दुसरी

48

मूल : स्थानिक नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी अनुष्का ठावरी तालुक्यात प्रथम तर सेंट अँन्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी प्राची बावने आणि दिव्या नरड ह्यांनी तालुक्यात अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. यावर्षी तालुक्यात प्रथम, व्दितीय आणि तृतीय येण्याचा मान मिळवत विद्यार्थीनींनी हम किसीसे कम नही सिध्द करून दाखविले आहे.
नवभारत कन्या विद्यालय मूलचा निकाल यावर्षी 92.41 टक्के लागला असून आठ विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण घेत यश मिळविले आहे. कुमारी अनुष्का प्रवीण ठावरी हिने 96.20% गुण घेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. सेंट अँन्स हायस्कुलचा निकाल १००% लागला आहे. या विद्यालयाची विद्यार्थीनी प्राची लालाजी बावने हीने 95.60% गुण मिळवुन तालुक्यात दुसरी तर याच विद्यालयाची दिव्या किशोर नरड ही 95.40% गुण मिळवुन तिसरी आली आहे.
येथील नवभारत कन्या विद्यालयाचा यावर्षीचा दहावीचा निकाल 92.41% लागला लागला आहे. विद्यालयाच्या 7 विद्यार्थीनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण झाल्या. कु. वैष्णवी प्रमोद चटारे (93.20) टक्के, कु. लिना गोपीनाथ शेंडे (93.20) टक्के, कु. कोमल चंदू त्रिपत्तीवार (92.00), कु. जानवी सचिन चौखुंडे (91.60) कु.दिक्षा संजय जवादे (90.80), कु. अक्षरा संजय बावणे (90.20) यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.
या विद्यालयातील 11 विद्यार्थीनी 80 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले आहे. तर 70 टक्के पेक्षा अधिक गुण घेणा-या विद्यार्थीनीची संख्या 20 आहे. 39 विद्यार्थीनी 60 टक्केपेक्षा अधिक गुण घेवून प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. नवभारत कन्या विद्यालय ही मूल तालुक्यातील एकमेव मुलींची शाळा असून दरवर्षीच या शाळेचा निकाल दर्जेदार लागत असतो.
तालुक्यात १००% निकालाची परंपरा कायम ठेवणा-या सेंट अँन्स हायस्कुलच्या स्वरूपा किशोर लाडे (94.60), संचिरा राजु चिकाटे (94.40), हुरेन सोहेल शेख (94.40), तन्वी राकेश सातपैसे (94.40), चैतन्य झरकर (92.60) प्राची जगदीश बुरांडे (92.60) सिया अरोरा (92.40) राज ठिकरे (92.20) सम्यक गेडाम (91.40) सचिञा सोनुलवार (91%) गुण मिळविले आहे. या विद्यालयातील 52 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असुन 8 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
नव भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अल्का राजमलवार, पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे आणि ज्येष्ठ शिक्षक विजय सिद्धावार यांनी अनुष्का ठावरी हिच्या घरी जाऊन तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here