अभाविपने केला सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

55

मूल : साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या राज्यस्तरीय पाञता परीक्षा मूल येथील तीन विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली आहे. त्यानिमित्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुल च्या वतीने मुल शहरातील सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जात पालकांसमवेत नुकताच सत्कार करण्यात आला, शहरातील शुभम सुधाकर डांगे यांचा चिरंजीव इतिहास, ओंकार सुभाष चनावार याने गणीत तर कु रागिणी गणेश उमलवार या विद्यार्थ्यांनीने प्राणीशास्ञ या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे, यातील शुभम डांगे व ओंकार चनावार याचे वडील शिक्षक असुन कु रागिणी उमलवारचे वडील हे शहरात चहा विक्री करत कुटूंबाची उपजीविका चालवातात. तिन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला, डॉ सौ किरण कापगते, डॉ खुशाल राठोड, प्रविण मोहुर्ले,’सुखदेव चौथाले, प्रज्योत रामटेके, प्रदून्य कंदिकुरवार, प्रा शेंडे, गणेश कावळे, कुणाल शेंडे, यश रामटेके, बालू कोमलवार, पियुष कवाडकर, प्रदीप करकाड़े व इतर अभाविप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here