संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी वंदना आगरकाटे यांची नियुक्ती

49

मूल : निराधारांचा आधार बनलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या मुल तालुका अध्यक्ष पदी गडीसुर्ला येथील सौ वंदना गिरीश आगरकाटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनाताई आगरकाटे ह्याषमागील कित्येक वर्षापासुन भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. राजकारणासोबतच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचे कार्य आणि निष्ठा लक्षात घेवुन जिल्ह्याचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारसी नुसार जिल्हाधिकारी यांनी सौ. वंदना आगरकाटे यांचेसह सदर समितीच्या सदस्यपदी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पुजा डोहणे (चिंचाळा) सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती उर्मीला कडस्कर (चिखली) मुन्ना कोटगले (बेंबाळ) नितीन रूपेश्वर गुरूनुले (फिस्कुटी) अनुप नेरलवार (मारोडा) संजय बोनकुलवार (राजोली) दिलीप पाल (चांदापूर) राकेश ठाकरे (मूल) नामदेव आनंदराव कावळे (मूल) आदींची निवड केलेली आहे. सदर निवड ही राज्याचे वने, सांस्कृतिक , मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व गोंदिया चे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार झाली असून अध्यक्ष सौ. वंदनाताई आगरकाटे आणि नवनियुक्त सदस्यांचे परीसरात अभिनंदन होत आहे. दरम्यान सौ. वंदनाताई आगरकाटे यांनी पालाकमंञी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले असुन प्रामाणिकपणे कार्य करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here