मुल – यावर्षीचे शैक्षणिक सत्र १ जुलै पासून सुरु झाले असून आणि शाळा महाविद्यालये देखील नियमितपणे सुरू होऊन १५ दिवस लोटून गेले, मात्र अजूनही ग्रामीण भागांमधून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळाच्या वेळात बस सुविधा उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त होत आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शक्षणीक नुकसान होत असल्याचे ग्रामीण भागातील पालकांनी बोळून दाखविले आहे.
मूल तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुले मुली शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता ये जा करतात श्रीमंतांची व साधारण कुठुंबतील मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात ,त्यांना येण्याजण्याकरिता खाजगी बस उपलब्ध आहेत, परंतु ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरी करणारे कामगार यांनी आपले मुले पाल्य शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे मोठ्या शाळेत उत्तम शिक्षण घेतले पाहिजे या हेतूने आपल्या पाल्यांना शहरातील शाळेत शासनाने विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या मानव विकास योजनेच्या बसेस शाळा सुरू होताच एस. टी. महामंडळाने ग्रामीण भागात सुरु करायला पाहिजे. परंतु १५ दिवसाचा कालावधी होऊन सुद्धा अजूनही बसेस सुरु करण्यात आलेल्या नाही. कारण बसच्या सुविधेने शिकण्याकरिता पाठवितात.मात्र दरवर्षी विद्यार्थ्यांना किमान गरजे ऐवढीही सुविधा पुरविल्या जात नसल्याचे विद्यार्थी , पालकांचे म्हणणे आहे. परिणामी विद्यार्थ्यांना सकाळच्या सुरुवातीच्या तासिकेची शिकवणी जाते. तर शाळा महाविद्यालयाची सकाळ पाळी १२-०० वाजेपर्यंत संपते त्यानंतर परतीच्या प्रवासात चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी हे मोठे रुठ , सोडले की ग्रामीण भागात लहान लहान गावामधून येणाऱ्या चिमुकल्या मुली दुपारी २-०० ते ३-०० वाजेपर्यंत बसस्थानकावर ताटकळत बसतात. मोठ्या उपहासकारक नजरेने, पोटात असंख्य कावडे ओरडत असताना , लहान तोंड करून, केविलवाण्या नजरेने वाहतूक निरीक्षकांना विचारतात, साहेब आमची बस कधी लागेल,! त्यावर साहेब उत्तर देतात आता थोड्या वेळात, अर्ध्या तासात, असं करत वेळ वाढत जाते
मात्र विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे तर काहीही लक्ष नाही,व प्रशासनाचे देखील लक्ष नाही. त्यामुळे प्रशासनही याकडे लक्ष देत नसल्याचे परिसरातील विद्यार्थी, पालकांमधे असंतोष पसरला आहे.
ही बाब अत्यंत गंभीर आहे याकडे शासन स्तरावर गांभीर्याने लक्ष घालून विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता वाहतूक सोई उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मुल बस स्थानकावर बसची वाट पाहत असलेल्या मुलींनी केली असून आमच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
Home Breaking News शाळा महाविद्यालय सुरू, परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी अजूनही बस सुरु केली...