मूल – वन व वन्यप्राणी आणि मानव ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून वनाचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण हे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी महत्वाचे आहे. म्हणूनच वन्यजीव व मानव यांचं नात चिरकाल अबाधित राहाव आणि वनासोबत वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे याकरिता चंद्रपुर वनविभाग वनवृत्त चंद्रपुर अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील वनालगतच्या सर्व गावात कला पथकाद्वारे जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला. वनपरिक्षेत्र चिचपल्ली क्षेत्रातंर्गत मूल तालुक्यातील येत असलेल्या चिंचाळा, कवडपेठ चिरोली, कान्तापेठ येथे मानव वन्यजीव संघर्ष च्या घटना वारंवार घडत होत्या, त्या अनुषंगाने विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे आणि सहाय्याक वन संरक्षक निखिता चौरे यांचे मार्ग दर्शनाखाली चिचपल्ली वन परिक्षेत्राचे वन परीक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे व त्यांचे अधिनस्त येत असलेले कर्मचारी यांचे उपस्थितित चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या वतीने कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कलापथक कार्यक्रमाच्या माध्यमातून वनविभाग चिचपल्ली यांनी जनजागृती करून वन्यप्राणी आणि वन संवर्धनासाठी जनतेला आवाहन केले. सदर मोहीम आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी चिचपल्ली वन परिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, वनसंरक्षण समितीचे सदस्य व नागरिक यांचे सहकार्याने परिश्रम घेत आहेत.