मूल : भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमीत्य दे धक्का एक्सप्रेसच्या वतिने भारताचे सविधान आणि भारतातील कायदे व शुद्र कोण होते? या पुस्तकाचे वितरण मूल येथील गांधी चौकात वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी होते. प्रमुख अतिथी म्हणुन अॅड. डॉ. कल्याणकुमार, व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, व्हाईस ऑफ मिडीयाच्या डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार, कॉंग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले, भाजपाचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु गेडाम, सर्व देश बांधवचे संपादक रविंद्र बोकारे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वलकुमार इंदुरकर, नगर पालीकेचे माजी सभापती प्रशांत समर्थ, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे. युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी मार्लापन करून मेनबत्ती प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले. महापुरूषांचे विचार पुस्तक रूपाने सामान्यातील सामान्य व्यक्तींपर्यत पोहचुन त्यांच्यात वैचारीक क्रांती घडावी हा उद्देश ठेवुन दे धक्काचे एक्सप्रेसचे संपादक भोजराज गोवर्धन आणि कार्यकारी संपादक मंगेश पोटवार यांनी सदर उपक्रम मागील वर्षीपासुन सुरू केलेला आहे. यावेळी 500 पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दे धक्का एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक मंगेश पोटवार यांनी केले, संचालन प्रशांत उराडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भोजराज गोवर्धन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी शाम उराडे, कुमार दुधे, दुर्वास घोंगडे, दिपक घोंगडे, आदित्य गेडाम, आनंदराव गोहणे, संगिता गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले.