लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळावा म्हणुन लढा उभारा. ओबीसी नेते बळीराज धोटे यांचे आवाहन, ओबीसी विचारमंचाच्या वतीने पार पडला गुरू-शिष्याच्या जयंती सोहळा

63

मूल : लोकसंख्ये नुसार आरक्षण देण्याचे भारताच्या राज्यघटनेत लिहुन असतांना लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षण न देता शासनकर्ते ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय करीत आहे, ही कृती राज्यघटनेचा अनादर करणारी असल्याने ओबीसी समाजाने लोकसंख्येच्या प्रमाणांत वाटा मिळावा म्हणून लढा उभारला पाहिजे. असे आवाहन सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संस्थापक तथा ओबीसी नेते बळीराज धोटे यांनी केले. स्थानिक ओबीसी विचार मंचच्या वतीने कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योजीबा फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक सुर्यकांत खनके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी फुले-शाहु-आंबेडकर विचार प्रवर्तक डाॅ. अभिलाषा गावतुरे, सामाजीक कार्यकर्त्या डाॅ. अल्का ठाकरे, ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते रामभाऊ महाडोरे, नत्थुपाटील आरेकर, सुनिल बल्लमवार, बौध्द महासभेचे जिल्हा सरचिटणीस रमेश मानकर, व्हाॅईस आँफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, भारतीय आदिवासी समाजाचे अध्यक्ष अशोक येरमे, विषमता निर्मुलन दलाचे संयोजक हिरालाल भडके, सामाजीक कार्यकत्र्या रत्नमाला गेडाम, डाॅ. राकेश गावतुरे, मुख्याध्यापक बिजवे, भारती मोटघरे यावेळी उपस्थित होते. महात्मा ज्योतीबा फुले आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन आणि दिप प्रज्वलन करून जयंती निमित्यच्या प्रबोधन कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. यावेळी शिक्षक विनोद मानापूरे यांनी भिम गीत सादर केले. प्रबोधन कार्यक्रमा दरम्यान डाॅ. अल्का ठाकरे यांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज प्रबोधनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार मंथन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली ओबीसी चळवळ आणि कर्मचारी या विषयावर मत व्यक्त करतांना डाॅ. अभिलाषा गावतुरे यांनी नोकर भरतीची प्रक्रिया राबवितांना कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करून पात्र व सक्षम युवापिढीचे खच्चीकरण करीत असल्याचे सांगीतले, अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सुर्यकांत खनके यांनी समाजातील उपेक्षीतांना सहकार्य करण्यासाठी प्रत्येकाने वटवृक्षासारखे समाजासोबत उभे राहण्याचे आवाहन केले. विचारमंच चे संयोजक प्रा. विजय लोनबले यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि विचारमंचाच्या निर्मितीची भूमीका प्रास्ताविकात मांडली. कार्यक्रमाचे संचलन विचारमंचचे संयोजक लक्ष्मण खोब्रागडे यांनी तर कैलास चलाख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा महासचिव गंगाधर कुनघाडकर, विमाशीचे अध्यक्ष देवराव ढवस, माजी सिनेट सदस्य सुनिल शेरकी, समता परिषदेचे राकेश मोहुर्ले, ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र बल्की, माळी महासंघाचे विदर्भ सचिव गुरू गुरनूले, प्रब्रम्हानंद मडावी आदिंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here