मूल : देश रक्षणासाठी देशाच्या सिमेवर पहारा देण्यासोबतचं नैसर्गिक आपत्तीच्या काळातही देशवासीयांच्या रक्षणासाठी जीवाचे रान करणा-या भारतीय सैन्य दलाचे कार्ये महान व अजोड असून आज त्यांच्याच कर्तव्यामूळे देशवासीय सुखरूप आहेत. असे मत माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी व्यक्त केले. माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजीत 75 व्या भारतीय सैन्य दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. माजी सैनिक वसाहतीमध्यें पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरूवात माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांचे हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी भारतीय ध्वजाला मानवंदना दिली. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गडेकर, माजी सैनिक भरारी महिला बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर, उपाध्यक्षा पुष्पा जंबुलवार, आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचे अधिक्षक गजेंद्र प्रधान, ज्येष्ठ माजी सैनिक मारोतराव कोकाटे, मारोती कुळमेथे आदि उपस्थित होते. संघटनेचे सचिव बाबा सुर यांनी प्रास्ताविक करतांना 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटीशांपासून मुक्तता होवून याच दिवशी लष्कर प्रमुखाने सैन्याची जबाबदारी स्विकारली. त्यामूळे 15 जानेवारी हा दिवस सैन्य दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. असे सांगीतले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गडेकर, महिला बचत गटाच्या अंजली सुर आणि पुष्पलता जंबुलवार यांनीही मनोगत व्यक्त करत शहीद सैनिकांप्रती आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचलन सहदेव रामटेके यांनी तर विजय भसारकर यांनी आभार मानले. यावेळी माजी सैनिक प्रकाश झरकर, प्रशांत पाटील, महिला बचत गटाच्या कवीता गडेकर, करूणा खोब्रागडे, कवीता मोहुर्ले, उज्वला रंगारी, सुनिता खोब्रागडे यांचेसह आदिवासी मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.