माजी सैनिक आणि भरारी महीला गटाने राबविली ग्राम स्वच्छता अभियान

100

मूल – माजी सैनिक संघटना मूल आणि माजी सैनिकी भरारी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्य ग्राम सफाई मोहीम राबविण्यात आली. स्थानिक डाँ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय पासुन तहसील कार्यालय पर्यंत राबविण्यात आलेल्या ग्राम सफाई कार्यक्रमातषमाजी सैनिक संघटना मूलचे अध्यक्ष एकनाथ गाडेकर, सचिव बाबा सुर, सल्लागार सचिव सहदेव रामटेके, ज्येष्ठ माजी सैनिक मारोतराव कुळमेथे यांचे सह माजी सैनिकी भरारी महिला बचत गट मूलच्या अध्यक्षा अंजली बाबा सुर सचिव कविता मोहुर्ले, उपाध्यक्ष पुष्पलता जांबुलवार सदस्य नियाजुनिसा शेख, सविता खोब्रागडे, करुणा खोब्रागडे यांनी हातात झाडु, खराटे आणि घमेले घेवुन मार्गावर झाडु मारत स्वच्छ केले. यापुर्वीही माजी सैनिक आणि भरारी महीला बचत गटाच्या वतीने गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, तुकडोजी महाराज जयंती आणि कारगिल दिनाचे औचित्य साधुन शहरात समाजोपयोगी उपक्रम राबविले असल्याने दोन्ही संघटनेचे अनेकांकडुन कौंतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here