स्व.संजय मारकवार यांचे स्मृती दिना निमित्त राजगड स्मशान भूमी परिसरात वृक्षारोपण, सिमेंट बेंच भेट आणि रुग्णांना ब्लँकेट व फळ वाटप

88

मूल – निर्भिड नेतृत्व,कर्तुत्व, संयमी आणि बहुआयामी सुपरिचित असलेले मुल पंचायत समितीचे सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशा अनेक पदावरुन ग्रामीण जनतेची सेवा करणारे स्व.संजय मारकवार यांचे स्मृती दिना निमित्त ६ डिसेंबर २२ रोजी सकाळी ८-३० वाजता राजगड येथील स्मशान भूमी परिसरात राजू मारकवार,स्वच्छ्ता दुत चंदू पाटील मारकवार, प्रदीप कामडे,रोशन लाडे, यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी ग्रामस्थ मोहन,सुरेश गोविंदा अमोल जयवंत पाटील, बाळा आदी उपस्थित होते. तसेच सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रुग्णांना ब्लँकेट व फळ वाटप करण्यात आले. माझा जिवलग सच्चा कार्यकर्ता हरपल्याचे दुःख अजूनही मनातून निघाले नाही.त्यांचे स्मृतीस माझे विनम्र अभिवादन असल्याच्या भावना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी फोन द्वारे व्यक्त केल्या. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, राष्ट्र संतांच्या विचाराचे प्रचारक चंदू पाटील मारकवार, राजू पाटील मारकवार, संजय मारकवार यांचे चिरंजीव अनिकेत मारकवार, तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरुभाऊ गुरनुले, डॉ. इंदुरकर, डॉ. वसीम व त्यांचे सहकारी, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर घडसे, काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी, उपाध्यक्ष कैलाश चलाख,काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य बंडू भाऊ गुरनुले, काँग्रेस ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, रोशन लाडे, न.प.माजी उपाध्यक्ष चंदू चटारे , पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here