डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

100

मूल : महापरीनिर्वान दिना निमित्त एचडीएफसी बँक शाखा मूल आणि बौद्ध समाज मूल शहर यांचे संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे मूल शहर अध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष विनोद निमगडे, प्रमूख अतिथी एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक क्रिष्णा कराडे, उपव्यवस्थापक किरण राणे, प्रमुख अतिथी माजी नगरसेविका सौ.ललिता फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले आदी उपस्थित होते.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण जगभरात विनम्र अभिवादन करण्यात येते. त्यानिमित्ताने मुल येथील एचडीएफसी बँक आणि बौद्ध समाज मूल शहर यांचे संयुक्त विद्यमाने आपले रक्तदान अनेकांसाठी जीवनदान हा उदात्त हेतू पुढे ठेवून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ही रक्तपेढी शासकीय रुग्णालयात देण्यात येणार असून गरजू रक्तदात्यास रक्त मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत गट्टूवार तर आभार पुरूषोत्तम साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता बँकेचे कर्मचारीवृंद आणि मूलचे राकेश मोहुरले, काजू खोब्रागडे, सुजित खोब्रागडे, अतुल गोवर्धन, कुमार दुधे, गुड्डू रामटेके, कार्तिक शेंडे, दीक्षांत मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here