मूल (प्रतिनिधी) वकृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वात आक्रमक असलेल्या माजी मंत्री शोभाताई आज पुन्हा काहीश्या आक्रमक झाल्याचे प्रत्यक्षदर्शीना दिसून आले. काम पुर्ण करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देवुनही पुर्णत्वात न आलेल्या बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी शोभाताई कार्यकर्त्यासह पोहोचल्या, तेव्हा स्थानकामधील गैरसोयी पाहुन एस. टी. प्रशासनाविरूध्द शोभाताई आक्रमक होत अपुर्ण काम महिण्याभरात पुर्ण करून गैरसोयी तात्काळ दुर कराव्या. अन्यथा जन आंदोलनाला सामोरे जावे लागेल. असा इशारा दिला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिनस्त येथील बस स्थानकाच्या बांधकामाची प्रक्रिया आँक्टोबर २०१६ पासून सुरू झाली. ८ कोटी रूपये खर्चून निर्माण होणा-या बस स्थानकाचे कंत्राट वर्धा येथील पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनीने स्विकारले. कामाच्या आदेशापर्यंत मार्च २०१८ पर्यंत कंत्राटदारास काम पुर्ण करावयाचे होते. परंतु प्रशासनातील तांत्रीक अडचणी आणि कामाच्या पध्दतीमूळे येथील बस स्थानकाच्या कामास फेबु्रवारी २०१८ पासून सुरू झाले. कामाच्या आदेशाप्रमाणे २०१८ पासून सुरू झालेले काम २०२० पर्यंत पुर्णत्वात यायला पाहिजे होते. परंतू दोन वर्षे जास्त होवूनही सदर काम पुर्ण झालेले नाही. सदर काम पुर्ण करण्यासाठी संबंधीत कंत्राटदारास दोनदा मुदतवाढ देवुनही काम पुर्ण होत नाही शिवाय आधुनिकीकरणाच्या नांवाखाली बांधकाम होत असलेल्या येथील बस स्थानकावर अनेक समस्या असल्याने प्रवाश्यांसह विद्याथ्र्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतची वास्तविक परिस्थिती पाहण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी आज सकाळी समर्थकांसह बस स्थानकावर आक्रमण केले. स्थानकाचा फेरफटका मारला तेव्हा जुने ते सोने म्हणत नवीन होत असलेल्या बस स्थानका पेक्षा जुनेच बस स्थानक व्यवस्थीत होते. असे मत व्यक्त केले. स्थानकावरील प्रवाश्यांची वर्दळ लक्षात घेता निर्माण केलेले महिला आणि पुरूषांकरीतांचे शौचालय मोजकेच असल्याचे निदर्शनास आले. प्रवाश्यांसाठी पिण्यासाठी शुध्द, थंड व मुबलक पाण्याचा अभाव असल्याचा दिसून आला. स्थानकाच्या परिसरात लावलेले गटू उद्घाटनापूर्वीच उखळत असल्याचे दिसून आले, स्थानकावरून धावणा-या बसेसची संख्या लक्षात घेता एस.टी बसेस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे दिसून आले. नियमित वाहतुक नियंत्रक नसल्याने अन्य कर्मचा-यांच्या खांदयावर भार ठेवून वाहतुक नियंत्रकाचे काम केल्या जात आहे. स्थानकावरून धावणा-या लाल पिवळया बसेस मध्यें विद्याथ्र्यांना बसु दिल्या जात नाही, स्थानकाची स्वच्छता नियमीत होत नसल्याने स्थानकाच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव आणि दुर्गंधीयुक्त वातावरण दिसून आले. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. पुरेश्या मुता-या अभावी प्रवाशी उघडयावर गरज भागवताना दिसून आले. तंबुसारखे आच्छादन असलेल्या स्थानकावर पुरेसी विद्युत व्यवस्था नाही, स्थानकावर बांधलेले दुकान अजूनही अपुर्ण आहेत. कर्मचारी विश्रांती कक्ष आणि कार्यालयात पंखे आणि प्रकाश व्यवस्था नाही. स्थानकावर लावलेल्या स्पारटेक्स चोपडया असल्याने प्रवाशी घसरून पडण्याची भिती आहे. स्थानकावर जादा बसेस सोबतचं विद्यार्थ्यांसाठी मानव मिशन योजनेच्या बसेस नसल्याने चामोर्शी, सुशी, बेंबाळ, येरगांव, पिपरी दिक्षीत, चिरोली, केळझर मार्गावर विद्याथ्र्यांच्या वेळेवर बसची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना उशीरा रात्रो पर्यत बसच्या प्रतिक्षेत स्थानकावर राहावे लागते. आदि समस्या निदर्शनास आल्याने शोभाताई आक्रमक झाल्या. वाहतुक नियंत्रकाचा प्रभार सांभाळणारे फुलचंद खोब्रागडे यांची भेट घेवून समस्यांचे निवेदन दिले. दरम्यान चंद्रपूर विभाग नियंत्रक सुठावणे मॅडम यांचेशी संपर्क साधून स्थानकावरील समस्यांचा येत्या आठवडा भरात निपटारा करण्या सोबतचं स्थानकाचे अपुर्ण काम लवकरात लवकर पुर्ण करावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला. यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप, लोकनाथ नर्मलवार, विपीन भालेराव, सुरज मांदाडे, अविनाश वरगंटीवार, संतोष चिताडे, साहील येनगंटीवार, अशोक बुटले, संजय मारकवार, मिलींद हेडावू आदि कार्यकर्ते आणि प्रवाशी मोठया संख्येने होते.