जुनासूर्ला येथील अनुराग गोवर्धन यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार जाहीर

75

जुनासूर्ला येथील अनुराग गोवर्धन यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार जाहीर

प्रशांत दामले यांनी पत्रानुसार दिली माहिती

मूल :- कला फाउंडेशन संस्थेचे संस्थापक कवी प्रशांत दामले यांनी महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कारा करीता अनुराग रविंद्र गोवर्धन यांची नुकतीच निवड केलेली आहे. कला फाउंडेशन तर्फे दर वर्षी सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, अभिनय, पत्रकारिता, आरोग्य पर्यावरण या विकासासाठी योगदान देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षी सुद्धा कला फाउंडेशनच्या वतीने १ दिवसीय राज्यस्तरीय पाहिले शब्द फुलोरा साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात होणाऱ्या पुरस्काराचा निकाल संस्थापक अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नुकताच जाहीर केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जूनासुर्ला या छोट्याश्या खेडेगावात वास्तव्यास असणाऱ्या युवक अनुराग गोवर्धन यांनी अतिशय कमी वयापासून साहित्य लिखाणास सुरुवात केली. साहित्या सोबतच सामाजिक कार्यात सुद्धा अनुराग ने विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. मराठी भाषेविषयी आवड असलेल्या अनुराग ने १६ वर्षापासून कविता, लेख लिहिण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्याला कविरत्न, साहित्य रत्न, अशी दोन पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेली आहेत. गेली दोन वर्षापासून अनेक संस्थेच्या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्याने सहभाग नोंदविला आहे.

अनुराग सद्या सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे बी. ए. तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. आपली मराठी भाषा, संस्कृती जपण्यासाठी व भाषिक सौंदर्य वाढविण्यासाठी त्याचा नेहमीच कल लागलेला असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here