मूल – २६ वी राज्यस्तरीय थांग -ता मार्शल आर्ट (ढाल तलवार) ही स्पर्धा कोल्हापूर येथे नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून १ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत मूल येथील बल्लारपूर पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत असलेली कु, सानवी सुमित समर्थ ह्या सहा वर्षाच्या चिमुकलीने स्पर्धेत सहभाग घेवून ६ वर्ष वयोगटात २१ वजन गटात तृतीय क्रमांक पटकावून आपली शाळा आणि मूल शहराचे नाव लौकिक केला. सदर विद्यार्थिनीचे राष्ट्रीय स्पर्धकरिता कन्याकुमारी येथे होऊ घातलेल्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या करीता सानवी हीचे प्रशिक्षक रंगनाथ पेडूकर तसेच पालक सुमित समर्थ यांच्या प्रेरणेने तिने हे यश संपादन केल्याचे सांगितले. हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. बाबासाहेब वासाडे सचिव अँड, अनिल वैरागडे, प्राचार्य विनोद बोलीवार तथा सर्व शिक्षक शिक्षिका मूल शहरातील नागरिकांनी सानवीचे अभिनंदन कले.