जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतला मूल-सावली तालुक्याचा आढावा, मूल येथे पार पडली आढावा बैठक*

125

मूल (प्रतिनिधी) चंद्रपूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूल येथे भेट देऊन स्थानिक उपविभागीय कार्यालयात मूल आणि सावली तालुक्यातील विविध विकास काम आणि शासकीय कार्यालयाचा आढावा घेतला व सर्व विभागांनी जनतेला ञास होणार नाही यादृष्टीने आपले काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.
महसूल, ग्रामविकास, कृषी, नगर तालुकास्तरावर या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिका-यांनी आसोलामेंढा धरणाची उंची वाढविणे, त्यामुळे होणारे परिणाम व उपाययोजना बद्दल आढावा घेतला. तसेच चिचडोह बॅरेजबदद्दल माहिती जाणून घेतली. मूल व सावली तालुक्यात मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणेने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाने रबी हंगामक्षेत्र वाढीकरीता योग्य नियोजन करावे. पीएमकिसान मधील शिल्लक लाभार्थ्यांना गावनिहाय शोधून त्यांच्यापर्यंत पोहचणे आणि योजना सर्वव्यापक करणे, अतिवृष्टी पीक नुकसान अनुदान १००% लाभार्थ्यांच्या खात्यात टाकणे आदींबाबत सुचनाही केल्या.
मूल येथील डाँ,पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाची प्रस्तावित जागा व रेल्वे मालधक्का संदर्भात चर्चा करून प्रत्यक्ष जागेची पाहणी करून विषय समजावून घेतले. रोहयो अंतर्गत मामा तलाव कामाचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रवींद्र होळी, गटविकास अधिकारी देव गुणावत, ठाणेदार सतिशसिंह राजपूत, सावलीचे तहसीलदार परिक्षीत पाटील, सावलीच्या गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे व इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here