मूल – मा.आयुक्त मानव विकास समिती नागपूर विभाग नागपूर यांची सितांगन अँग्रौ प्रोड्यूसर कंपनी लि. यांनी तालुक्यातील मारोडा येथील प्रकल्पाला भेट दिली. तालूक्यात स्थापन झालेल्या सितांगन अँग्रो प्रोड्यूसर कंपनी लि.मारोडा शेतक-याच्या शेती क्षेत्रातील अडचणी व समस्यांवर काम करीत असून कंपनीच्या ५०० सभासद शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकास घडविण्यासाठी काम करीत असुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ सभासद शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे. शासनाच्या शेतकरी उत्पादक कंपण्यांकरिता विविध योजना आहेत.कंपनीचा सिड क्लिनींग अँन्ड ग्रेडींग प्रकल्प कार्यान्वित झालेला असून अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. शासकीय योजनेच्या माध्यमातून ४०० मेट्रिक टन साठवन क्षमतेचे साठवण गृहाचे १०० टक्के काम पूर्णत्वाकडे आहे .सदर प्रकल्पाचे पाहणी करीता मा. पाटील, आयुक्त मानव विकास समिती, मा. धोंगडे, जिल्हा नियोजन अधिकारी चंद्रपूर, जिल्हा मानव विकास समितीचे मनोहरे, उपसंचालक कृषी चंद्रपूर जिल्हा आणि चमू यांनी कंपनीच्या प्रकल्पस्थळी भेट देवुन समाधन व्यक्त केले. पुढील काळात स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकासाकरीता नवनविन प्रकल्प नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याकरीता उपस्थित संचालक मंडळ आणि सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कंपनीच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि ब्लॅक राईस देऊन स्वागत करण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे यांनी प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती सादर केली. प्रा.राजेश्वर राजूरकर संचालक महा आँरगॅनिक अँन्ड रेसिड्यू-फी फार्मस असोसिएशन पुणे महाराष्ट्र तथा एस ए पी सी एल मारोडा , संचालक सूधाकर चौधरी, सत्यवान सोनूले, मुद्दमवार ,प्रा. गुलाब मोरे, डि.के.जनबंधू, म्हशाखेत्री, दिपक बोर्डावार आणि तालुका कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक ऊईके आणि कुंभारे आदी उपस्थित होते.
Latest article
नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट, मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन...
*नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट*
*मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा*
मूल : शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या...
पंधरा दिवसात पाच जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा, संतोषसिंह रावत यांचा आंदोलनाचा...
मूल : पंधरा दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील पाच जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामूळे जनसामान्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून जीवघेण्या वाघांचा बंदोबस्त करावा. अशी...
श्रीकृष्ण हुड्डा यांची सेवानिवृत्त कर्मचारी सेलच्या सोनीपत विधानसभाध्यक्ष पदावर निवड
मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत वाहन चालक पदावर सेवारत राहीलेले, बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे एकेकाळचे...