मूल येथील न्यायालयात वृक्षारोपण संपन्न

125

मूल : पृथ्वीवर होणारे वाढते प्रदूषण बघता व त्यावर आळा घालण्या करिता वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मानवी जीवन आणि पृथ्वी वरील इतरही सजीव मुक्त संचार करणाऱ्या करिता पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. हा उद्देश डोळ्या समोर ठेवुन स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात येथील दिवाणी न्यायाधीश पंकज अहिर व सह दिवाणी न्यायाधीश समीर कमलाकर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत, मूल बफर झोन चे वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, बार असोसिएशनचे सर्व अधिवक्ता न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here