*स्व.वामनराव गड्डमवार कार्यकर्तांचा गोतावळा निर्माण करणारे रसायन होते-आ. सुभा
सावली : जिल्हयाच्या विकासात गटबाजी न करणारे वामनराव गड्डमावार शेतीवर नितांत प्रेम करणारे राजकारणातील दिलदार व्यक्तीमत्व होते, जिल्हयातील जुन्या शिक्षण संस्थेच्या निर्मितीमध्यें त्यांचा सिंहाचा वाटा असून कार्यकर्त्यांचा गोतावळा निर्माण करणारे आगळे वेगळे रसायन होते. असे मत आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने आणि विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली, कुनघाडा, भेंडाळा, मारोडा आणि बोथलीच्या सहकार्याने आयोजीत संस्थाध्यक्ष स्व. वामनरावजी गड्डमवार जयंती सोहळया निमित्य आयोजीत मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण व उत्कृष्ट शेतकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सोहळयाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रांगणात संपन्न झालेल्या जयंती सोहळयाचा शुभारंभ स्व. वामनराव गड्डमवार यांच्या सहचारीणी श्रीमती सुशीला गड्डमवार यांचे शुभहस्ते झाले. यावेळी विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, माजी आमदार देवराव भांडेकर, डाॅ. नामदेव उसेंडी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक संघटनेचे विभागीय अध्यक्ष डाॅ. अनिल शिंदे, काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, विनायक बांगडे, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे शिबीर संयोजक डाॅ. वसंत वाघ आणि डाॅ. वैभव चंद्रा, बॅंकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक डाॅ. विजय देवतळे, पांडूरंग जाधव, संजय तोटावार, प्राचार्य सुर्यकांत खनके, नगराध्यक्ष लताताई वाळके, बाजार समिती सभापती गंगाधर वैद्य, राकेश रत्नावार, नगर पंचायत उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार आदि उपस्थित होते.
स्व. वामनराव गड्डमवार यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिप प्रज्वलन करून सोहळयाला सुरूवात झाली. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, डाॅ. नामदेव उसेंडी, संतोषसिंह रावत यांनी स्व. गड्डमवार ग्रामीण समस्यांची जाण ठेवणारे कार्यकर्त्यासाठी जीव देणारे नेते असल्याचे मत व्यक्त केले. स्व. वामनराव गड्डमवार यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकतांना आ. सुधाकर अडबाले यांनी विद्यमान शासनाच्या उदासिन धोरणामूळे राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावत असून पद भरतीसाठी खोक्यांचा व्यवहार सुरू झाल्याचे सांगीतले. आरक्षणामूळे भविष्यात नोक-या मिळणे कठीण जाणार असून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचेही आवाहन आ. अडबाले यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील उत्कृष्ठ शेतकरी समीर घरत आणि विवेक प्रधाने यांचा आणि महाविद्यालयातील गुणवंत आणि कला व क्रिडा क्षेत्रात नैपुण्यप्राप्त विद्याथ्र्यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मानीत करण्यांत आले. कार्यक्रमा दरम्यान नंदाताई अल्लुरवार यांनी संकलन केलेल्या स्व. वामनराव गड्डमवार यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारी चित्रफित दाखविण्यात आली. संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डाॅ.राजश्री मार्कंडेवार आणि डाॅ. रामचंद्र वासेकर यांनी संचलन आणि कार्यकारी प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने जयंती सोहळयाची सांगत झाली. कार्यक्रमाला भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालकवृंद, तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी, काॅंग्रेस कार्यकर्ते, संस्थेद्वारा संचालीत विद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी वृंद आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.